हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Itel A95 5G – आईटेलने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Itel A95 5G लाँच केला आहे. कंपनीच्या A-सिरीजअंतर्गत येणारा हा स्मार्टफोन बजेट किंमतीत 5G कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आला आहे. Itel A95 5G मध्ये 6.67 इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले दिला आहे . तसेच यामध्ये ग्राहकांना 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी अन 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा दिलेला आहे. त्यामुळे ग्राहकांना दमदार फोन कमी किमतीत मिळू शकतो. तर चला या स्मार्टफोन बदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Itel A95 5G चे फीचर्स –
Itel A95 5G मध्ये 6.67 इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले दिला असून, याला 120Hz चा रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटचा सपोर्ट आहे. स्क्रीनचे संरक्षण Panda Glass ने करण्यात आले आहे. परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो Android 14 वर आधारित आहे. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.
दमदार बॅटरी –
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये IP54 रेटिंग आहे, त्यामुळे तो डस्ट आणि पाण्याच्या हलक्या फवार्यांपासून सुरक्षित राहतो. सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. डिझाइनच्या बाबतीत, फोन केवळ 7.8mm जाडीचा असून तो इन्फ्रारेड सेन्सरसह सुसज्ज आहे.
प्रायमरी रिअर कॅमेरा-
फोटोग्राफीसाठी Itel A95 5G मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा दिला असून, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. हा कॅमेरा 2K व्हिडिओ रेकॉर्डिंग, ड्युअल व्हिडिओ कॅप्चर आणि व्लॉग मोड सपोर्ट करतो. याशिवाय फोनमध्ये AI Voice Assistant, Aivana, Ask AI सारखी AI आधारित टूल्स दिली आहेत. डिव्हाइसमध्ये Dynamic Bar फीचर देखील आहे, जे यूजर इंटरफेसला अधिक आकर्षक बनवतं.
Itel A95 5G ची किंमत –
या फोनची (Itel A95 5G) सुरुवातीची किंमत 9,599 रु ठेवण्यात आली असून, 4GB RAM व 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. याशिवाय 6GB RAM आणि 128GB स्टोरेज वर्जन 9,999 रु मध्ये मिळणार आहे. Itel A95 5G तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे , Black, Gold आणि Mint Blue. कंपनीकडून या डिव्हाइसवर 100 दिवसांची स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा देखील दिली जात आहे, जी वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.