ITR File Rules : ITR भरताना ‘या’ चुका टाळा; नाहीतर, आयकर विभाग करेल कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ITR File Rules) जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला ITR भरणे गरजेचे आहे. मात्र, तुमचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर तुमचे उत्पन्न करपात्र मानले जात नाही. त्यामुळे तुम्ही ITR नाही भरला तरी चालेल. पण आजच्या धावत्या स्पर्धात्मक युगात जो तो सॅलरी हाईकच्या मागे पळतो आहे. अशा काळात बऱ्याच लोकांचे उत्पन्न २.५ लाख किंवा त्याहून जास्त असेल असे मानता येईल. सध्या देशातील जे आयकरदाते आहेत त्यांच्या माध्यमातून या नव्या आर्थिक वर्षात कर भरणा सुरू झाला आहे. जर तुम्हीही ITR भरता तर तुम्हाला आयकर विभागाचे सर्व नियम माहित असायला हवे. कारण ITR भरतेवेळी एक जरी चूक झाली तरी ती तुम्हाला महागात पडू शकते.

आयकर विभागाच्या माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा २ पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे बरेच लोक ऑनलाईन पद्धतीने ITR भरणे पसंत करतात. पण अशावेळी आपण चुका करण्याची शक्यता जास्त असते. आयकर विभागाच्या माध्यमातून करदात्यांसाठी बरेच नियम आहेत. (ITR File Rules) शिवाय तुमच्या प्रोफाईलवर एखादा व्यवहार चुकीचा आढळ्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे ITR भरताना काही गोष्टींची कायम काळजी घ्यायला हवी. म्हणूनच ITR भरताना कोणत्या चुका तुमच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात? याविषयी आपण जाणून घेऊ.

ITR भरताना ‘या’ चुका टाळा (ITR File Rules)

1) बँक खात्यात 10 लाखापेक्षा अधिक रक्कम

जर तुमचे खाते सरकारी, खाजगी किंवा सहकारी बँकेत असेल आणि वर्षभरात या खात्यात १० लाख वा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केली असेल तर याची माहिती तुम्हाला आयकर विभागाला देणे गरजेचे आहे. याबाबत जर तुम्ही आयकर विभागाला माहिती दिली नाहीत तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता असते.

2) 30 लाखापेक्षा जास्त किंमतीची प्रॉपर्टी खरेदी

एका आर्थिक वर्षात ३० लाख वा त्यापेक्षा जास्त रकमेची मालमत्ता रोख स्वरूपात खरेदी करताना नोंदणी आणि मुद्रांक विभाग अशा व्यवहारांची माहिती आयकर विभागाला द्या. (ITR File Rules) याबाबत माहिती न दिल्यास तुम्हाला संबंधित प्रॉपर्टीबाबत विचारणा केली जाऊ शकते. तसेच नोटीस पाठवून कारवाई देखील होऊ शकते.

3) म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात 10 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक

जर तुम्ही म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर आयकर खात्याला माहिती द्या. नियमानुसार, एका आर्थिक वर्षांत जर १० लाख रुपयांची गुंतवणूक केली गेली असेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

4) एफडीमध्ये 10 लाखापेक्षा जास्त ठेव

मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करताना एका आर्थिक वर्षात एफडीमध्ये १० लाख वा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केली असेल तर याबाबत तुम्हाला विचारणा होऊ शकते. (ITR File Rules) माहिती न दिल्यास कारवाई देखील होऊ शकते.

5) क्रेडिट कार्डचे बिल 1 लाखापेक्षा जास्त

क्रेडिट कार्ड युजर्सच्या कार्डचे बिल १ लाख रुपये किंवा त्या पेक्षा अधिक असेल आणि ते तुम्ही रोख स्वरूपात भरत असाल तर तुमच्या उत्पन्नाचा स्रोत काय याविषयी आयकर विभागाला माहिती द्या. असे न केल्यास नोटीस पाठवून कारवाई होऊ शकते. (ITR File Rules)