Jackfruit Recipes : कधी फणसाचा खिमा खाल्लाय का? एकदा खाऊन तर बघा, नॉनव्हेज विसरूनचं जाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jackfruit Recipes) उन्हाळ्याच्या दिवसांत आंबा जितका खाल्ला जातो तितकाच फणस सुद्धा आवडीने खाल्ला जातो. या दिवसांमध्ये छोटे छोटे फणस गऱ्यांसाठी नव्हे तर काप्या, पोळ्या आणि खास करून भाजीसाठी वापरले जातात. फणसाची भाजी अत्यंत चविष्ट आणि तब्येतीसाठी उत्तम मानली जाते. फणसाची भाजी प्रामुख्याने उन्हाळ्याच्या मौसमातच केली जाते. शाकाहारी लोकांसाठी मांसाहाराला पर्याय म्हणून फणसाच्या भाजीकडे पाहिले जाते. वेगन लोक तर आवडीने फणस खातात.

फणस शाकाहारी पदार्थांमध्ये मोडत असला तरी मांसाहाराच्या तोडीस तोड आहे. (Jackfruit Recipes) त्यामुळे एखाद्या दिवशी मांसाहाराला पर्याय म्हणून फणस खाऊन बघाच. आजपर्यंत तुम्ही मांसाहारात बरेच प्रकारचे खिमा खाल्ले असाल. शिवाय शाकाहारी आहारात सोया खिमा, व्हेज खिमा सुद्धा चाखला असाल. पण कधी फणसाचा खिमा खाल्लाय का? खाल्ला नसाल तर एकदा जरूर टेस्ट करा.

फणसाच्या चमचमीत खिम्यासमोर तर मांसाहार सुद्धा तुम्हाला फिका वाटेल. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर swantcookai नावाच्या अकाउंटवर फणसाच्या मस्त खिम्याची रेसिपी शेअर करण्यात आली आहे. या रेसिपी व्हिडिओला आत्तापर्यंत ३४.५ K इतके व्ह्यूज मिळाले आहेत. (Jackfruit Recipes) हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि म्हणूनच उन्हाळ्याच्या मौसमाचे औचित्य साधून ही रेसिपी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

फणसाचा खिमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

फणस, कांदा, टोमॅटो, हिरवा मटार, आले- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, तमालपत्र, वेलची, काळी मिरी, जिरे पूड, धणे पूड, गरम मसाला, तिखट, तेल, तूप, पाणी.

असा बनवा चमचमीत फणसाचा खिमा (Jackfruit Recipes)

सगळ्यात आधी एक लहानस फणस घ्या आणि त्याचे वरील कडक आवरण काढून घ्या. फणस नीट स्वच्छ करून बारीक चिरून घ्या आणि व्यवस्थित गरगरीत शिजवून घ्या.आता एका कढईमध्ये तेल आणि तूप एकत्र तापवून घ्या. यात तमालपत्र, वेलची, काळी मिरी चांगली परतून त्यामध्ये २ बारीक चिरलेले कांदे अगदी लाल गुलाबी तांबूस रंगाचे होईपर्यंत परतून घ्या. आता या कांद्यात आले- लसूण पेस्ट घालून त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. (Jackfruit Recipes) यानंतर हळद घालून बारीक चिरलेला टोमॅटो घाला. पुढे टोमॅटो हलका शिजला की त्यात धणे पूड, जिरे पूड, तिखट घालून मिक्स करा. आता थोडेसे पाणी घालून सर्व पदार्थ ढवळून घ्या.

या मिश्रणात मटार आणि शिजवलेल्या फणसाचे बारीक तुकडे घालून चवीनुसार मीठ घालून सर्व पदार्थ व्यवस्थित ढवळून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि फणसाचा खिमा व्यवस्थित शिजवून घ्या. काही मिनिटांनी तपासून पहा. तयार झालेल्या खिम्यात गरम मसाला घालून आणखी २ मिनिट मंद आचेवर उकळून घ्या. अखेर खिम्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्या. तुमचा मस्त चमचमीत आणि स्वादिष्ट असा फणसाचा खिमा तयार. हा खिमा तुम्ही पोळी, पराठा किंवा पावाबरोबर अगदी मिचक्या मारून खाऊ शकता. (Jackfruit Recipes)