Jagriti Yatra2025 : भारतभर फिरण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते. जर तुम्ही तरुण असाल, फिरण्याचा छंद असेल आणि देशाचा विविधतेने भरलेला अनुभव घ्यायचा असेल, तर ‘जागृती यात्रा’ नावाची ट्रेन तुमच्यासाठी उत्तम संधी घेऊन आली आहे. विशेष म्हणजे, ही ट्रेन फक्त २५ रुपयांत भारताचा कोपरा-कोपरा दाखवते!
काय आहे ‘जागृती यात्रा’? (Jagriti Yatra2025)
‘जागृती यात्रा’ ही २००८ सालापासून दरवर्षी एकदाच चालणारी विशेष ट्रेन आहे. तिचा उद्देश आहे उद्यमतेच्या माध्यमातून भारताचा विकास. या ट्रेनद्वारे देशभरातील निवडक ५०० तरुणांना १५ दिवसांच्या प्रवासात उद्योजकतेचे धडे दिले जातात.
प्रवास कधी सुरू होतो आणि कुठून?
या ट्रेनचा प्रवास नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतून सुरू होतो. ट्रेनचं पहिले थांबं अहमदाबाद असतो . त्यानंतर मुंबई, बेंगळुरू, मदुरई, ओडिशा मार्गे मध्य भारतात प्रवेश करून पुन्हा दिल्लीला परतते. या दरम्यान ती धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठिकाणी थांबते.
२०२५ मध्ये कधी आहे यात्रा?
साल २०२५ साठी ही यात्रा ७ नोव्हेंबरपासून सुरू होऊन २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपेल. मात्र, या ट्रेनसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. अंतिम तारीख: १५ ऑक्टोबर २०२५ अशी आहे. त्यामुळे तुमहाल या ट्रेनने प्रवास करायचा असेल तर अद्यापही वेळ गेलेली नाही. तुम्ही याकरिता नोंदणी करू शकता.
प्रवासाचे शुल्क फक्त ₹२५!
होय, तुम्ही जर पात्र असाल आणि सिलेक्शन प्रक्रियेत निवडले गेलात, तर तुमच्याकडून केवळ २५ रुपये शुल्कआकारले जाईल. संपूर्ण भारतभ्रमणासाठी एवढ्या कमी खर्चात ही एकमेव संधी आहे.
पात्रता काय?
- वय: २१ ते २७ वर्षे
- सामाजिक व उद्यमशील दृष्टिकोन
- देशाला काहीतरी देण्याची इच्छा असलेली विचारशील तरुणाई
- सिलेक्शनसाठी मल्टी-स्टेज इंटरव्ह्यू प्रक्रिया रजिस्ट्रेशन कुठे करावे?
तुम्ही https://www.jagritiyatra.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता.
‘जागृती यात्रा’ का खास आहे?
- १५ दिवस ट्रेनमध्ये राहण्याचा वेगळा अनुभव
- भारताच्या विविध कोपऱ्यांतील उद्योजक व बदल घडवणारे लोक भेटतात
- नवनवीन जागा, नव्या लोकांसोबत संवाद
- देशातील प्रेरणादायक कहाण्या ऐकण्याची संधी
- नेटवर्किंग आणि जीवनदृष्टी समृद्ध करणारा अनुभव
फक्त २५ रुपयांत तुमच्या आयुष्याला दिशा देणारी, देशभर फिरवणारी आणि विचारांत बदल घडवणारी ‘जागृती यात्रा’ ही एक अपूर्व संधी आहे. जर तुम्हीही देश घडवण्याचे स्वप्न पाहणारे, सामाजिक भान असलेले आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असलेले तरुण असाल, तर ही ट्रेन तुमच्यासाठीच आहे!
महाराष्ट्रात 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; प्रथम CAP राउंड, नंतर कोटा प्रवेश