Jalna Mumbai Janshatabdi Express : जालना ते मुंबई दरम्यान सुरु असणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस या रेल्वेचा विस्तार करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. एवढेच नाही तर हिंगोली बरोबरच परभणी येथील रेल्वे संघटनांसह हिंगोलीवासियांनी देखील यासाठी आंदोलन केलं होतं. अखेर हिंगोलीवासीयांच्या आणि परभणीकरांच्या आंदोलनाला यश आलं असून आता (Jalna Mumbai Janshatabdi Express) जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली ते मुंबई अशी धावणार आहे.
येत्या सात मार्चपासून जनशताब्दी एक्सप्रेस (Jalna Mumbai Janshatabdi Express) हिंगोली ते मुंबई अशी धावणार आहे. या रेल्वेला मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा कंदील दाखविण्यात येईल, अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. याशिवाय हिंगोलीवासीयांचा पाठपुरावा या भागातील लोकप्रतिनिधींकडूनही करण्यात येत होता. जालना ते मुंबई दरम्यान वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यानंतर जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत नेण्याची मागणी अधिक तीव्र करण्यात आली होती.
जनशताब्दी एक्सप्रेस (Jalna Mumbai Janshatabdi Express) सुरुवातीला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते छत्रपती संभाजीनगर अशी धावायची. तिला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही होता. यानंतर या रेल्वेचा विस्तार हा जालन्यापर्यंत करण्यात आला. आता दुसऱ्यांदा मार्गविस्तार हिंगोलीपर्यंत करण्यात आला आहे.
जनशताब्दी एक्सप्रेसचा हिंगोली पर्यंत विस्तार करण्यात येतोय. ही रेल्वे हिंगोलीहून पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी सुटणार असल्याची माहिती आहे. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची सोय होणार आहे मुंबईचा प्रवास सोयीचा होईल तसेच छत्रपती संभाजीनगर हून मुंबईसाठी (Jalna Mumbai Janshatabdi Express) आणखी एक रेल्वे सुरू होण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अरुण मेघराज यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली आहे.