कश्मीर खोऱ्यातील प्रवाशांची प्रतिक्षा अखेर संपली! पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी जम्मू-श्रीनगर वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवणार आहेत. यामुळे काश्मीर देशाच्या उर्वरित भागाशी अधिक वेगाने आणि सोयीस्कर पद्धतीने जोडले जाईल. देशभरातल्या पर्यटकांना अगदी आरामात आता पृथ्वीवरच्या स्वर्गाला भेट देणं शक्य होणार आहे.
चिनाब ब्रिज – जगातील सर्वात उंच रेल्वे पूल
ही ट्रेन चिनाब ब्रिज वरून जाणार आहे, जो नदीच्या तळापासून तब्बल 359 मीटर उंच आहे आणि हा एफिल टॉवरपेक्षाही 35 मीटर उंच आहे. तसेच ट्रेन अंजी खाद ब्रिज, भारताच्या पहिल्या केबल स्टे रेल्वे पूलावरूनही प्रवास करेल.
272 किमी लांब रेल्वे प्रकल्प पूर्ण
वंदे भारत ट्रेनच्या सुरूवातीमुळे 272 किमी लांब उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्प पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प 1997 मध्ये सुरू झाला होता आणि अखेर 2024 मध्ये पूर्णत्वास पोहोचला. यात 38 बोगदे, 927 पूल आणि भारतातील सर्वात लांब (12.75 किमी) ट्रान्सपोर्ट बोगदा T-49 देखील समाविष्ट आहे.
विशेष वैशिष्ट्ये
- -20°C पर्यंत कार्यक्षम एंटी-फ्रीझिंग तंत्रज्ञान
- भूकंप संवेदनशील भागासाठी सेस्मिक सेन्सर
- हीटिंग विंडशील्ड व बायो-टॉयलेट
- थंड हवामानात सुरळीत चालण्यासाठी विशेष डिझाइन
काय होणार फायदा?
- जम्मू-श्रीनगर प्रवास सोपा व जलद होणार
- पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळणार
- प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक व हवामानसुलभ प्रवास उपलब्ध होणार