Jar Tar Chi Goshta : ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी पूर्ण होताच प्रेक्षकांना मिळालं सुरेल गिफ्ट; प्रियाच्या आवाजातील गाणं रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jar Tar Chi Goshta) मराठी रंगभूमीवरील ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. प्रत्येकवेळी या नाटकाचा प्रयोग लागला असता नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. नाट्य रसिकांकडून मिळणारं हे प्रेम दिवसागणिक वाढत आहे ही आनंदाची बाब आहे. शिवाय आणखी एक आनंदाची बाब अशी की, हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी करत आहे. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील एक सुरेल गाणेदेखील प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्याला प्रिया बापटचा आवाज देण्यात आला आहे.

‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी पार (Jar Tar Chi Goshta)

प्रिया बापटच्या आवाजातील हे सुंदर गीत नात्यातील गुपित दर्शवणारे असून संगीतप्रेमींना हे गाणे आता कुठेही ऐकता येणार आहे. मुळात प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी सिने इंडस्ट्रीतील प्रचंड लोकप्रिय आणि तितकंच क्यूट कपल आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र पाहण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. दरम्यान, सुमारे एक दशकानंतर ही इच्छा ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाच्या निमित्ताने पूर्ण झाली. पाहता पाहता आता या नाटकाने यशाचे शिखर गाठले आणि आता शंभरी पार केली आहे.

Jar Tar Cha Gana

हीच या नाटकाची जमेची बाजू

हे नाटक अगदी प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आवडेल असे कौटुंबिक नाटक आहे. यामुळे प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकवर्ग या नाटकाला लाभत आहे आणि हीच या नाटकाची जमेची बाजू ठरत आहे. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह आशुतोष गोखले, पल्लवी अजय या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

(Jar Tar Chi Goshta) कथा, दिग्दर्शन, कलाकार हे सगळे उत्तम जुळून आल्यानेच ही सर्वोत्कृष्ट कलाकृती आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांचे लेखन या नाटकाला लाभले आहे. तर नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत.

एकाच वेळी मनात अनेक भावना..

‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाबद्दल बोलताना अभिनेत्री प्रिया बापट म्हणाली की, ‘खरंतर हे सांगताना खरंच खूप आनंद होतोय की, आज आमच्या शंभराव्या प्रयोगचा टप्पा आम्ही गाठला आहे आणि इतर प्रयोगांप्रमाणे हा प्रयोगही हाऊसफुल्ल होता. एकाच वेळी मनात अनेक भावना आहेत. आनंद आहे, भारावले आहे, जबाबदारी आहे. (Jar Tar Chi Goshta) या गोष्टी शब्दांत मांडणे अशक्यच. परंतु एक आवर्जून सांगेन, हा पल्ला गाठणे, रसिकप्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाले. तुमचे प्रेम आमच्यावर असेच राहू दे. या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे ही डबल ट्रीट आहे’.