Jio Cinema Premium Plan : Jio Cinema ने लॉन्च केला जबरदस्त प्रीमियम प्लॅन; फक्त 29 रुपयांत महिनाभर होणार Ad फ्री मनोरंजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jio Cinema Premium Plan) आजकाल मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. अगदी घर बसल्या निवांत मनोरंजन देणारा हा एक उत्तम पर्याय आहे. दरम्यान, रिलायन्स जिओने ओटीटी सेगमेंटवर वर्चस्व गाजवण्याची जोरदार तयारी केल्याचे दिसून आले आहे. जिओ कंपनीने Amazon Prime, Disney Plus Hotsar आणि Netflix सारख्या ॲप्सला टक्कर देत २ स्वस्त आणि मस्त अशा योजना लॉन्च केल्या आहेत. या योजनांमुळे जिओ टीव्हीचे स्बस्क्रायबर वाढण्याची शक्यता आहे. चला तर जिओने लॉन्च केलेल्या २ जबरदस्त योजनांविषयी सविस्तर माहिती घेऊया.

जिओने लॉन्च केले 2 जबरदस्त प्लॅन (Jio Cinema Premium Plan)

रिलायन्स जिओ टीव्हीने युजर्ससाठी अतिशय कमी दरात आपल्या युजर्ससाठी २ जबरदस्त आणि जाहिरातमुक्त योजना लॉन्च केल्या आहेत. हे दोन्ही प्लॅन जिओ सिनेमा प्रीमियमच्या १ महिन्याच्या वैधतेसह लॉन्च करण्यात आले आहेत. ज्यावर तुम्हाला ५१% इतकी मोठी सूट मिळते आहे. या प्लॅन्सच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले तर, या प्लॅनची ​​किंमत केवळ २९ रुपये इतकी आहे. तर इतर प्लॅनची ​​किंमत ८९ रुपये इतकी आहे. दोन्ही प्लॅनच्या किमतीत तफावत असल्याने दोन्ही प्लॅनमध्ये मिळणारे फायदे वेगवेगळे आहेत. याविषयी देखील माहिती घेऊया.

29 रुपयांचा जिओ सिनेमा प्रीमियम प्लॅन

जिओ सिनेमाचा २९ रुपयांचा प्लॅन हा आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे. (Jio Cinema Premium Plan) या प्लॅनची खासियत सांगायची म्हणजे, हा प्लॅन खरेदी केल्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ स्ट्रीम करतेवेळी जाहिरातींचा सामना करावा लागणार नाहीये. शिवाय हा प्लॅन ३० दिवसांच्या वैधतेसह येणार आहे. मात्र, हा प्लॅन एका वेळी केवळ एकाच डिव्हाइसवर वापरता येईल. त्यामुळे जर आपण २९ रुपये आणि ३० दिवसांची वैधता पाहिली तर १ दिवसासाठी १ रुपयाच मोजावा लागणार आहे. अर्थात हा प्लॅन अत्यंत स्वस्त आणि खरोखरच मस्त आहे.

जिओ सिनेमाच्या 29 रुपये आणि 89 रुपये प्लॅनमधील फरक

जिओ सिनेमाचे २९ रुपये आणि ८९ रुपये हे सगळ्यात स्वस्त आणि कमालीचे असे प्लॅन आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये काय फरक आहे असे विचारले असता आम्ही सांगू की, ८९ रुपयांचा प्रीमियम प्लॅन खरेदी करणाऱ्या वापरकर्त्यांना २९ रुपयांच्या प्लॅनसारखेच फायदे प्रदान केले जात आहेत. (Jio Cinema Premium Plan) मात्र, तुमच्या कुटुंबातील ४ सदस्य या प्लॅन अंतर्गत सर्व प्रीमियम स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतील. आता अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, हा प्लॅन खरेदी केल्यावर तुम्ही ४ वेगवेगळ्या डिव्हाईसवर लॉग इन करू शकता. या प्लॅनची वैधता देखील ३० दिवसांची मिळेल.

आपण या प्लॅनच्या फायद्यांविषयी बोलत आहोत तर हे देखील जाणून घ्या की, दोन्ही प्लॅनमध्ये युजर्सला 4k पर्यंतच्या गुणवत्तेत स्ट्रीमिंग करता येईल. शिवाय आवडता कंटेंट डाउनलोड करून वेळ मिळेल तेव्हा पाहण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे. या दोन्ही योजना Jio सिनेमाच्या अधिकृत साइटवर सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत. (Jio Cinema Premium Plan)