Jio Recharge Plan : 894 रुपयांत 11 महिन्यांचा रिचार्ज; Jio ची ग्राहकांना खास भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jio Recharge Plan) रिलायन्स जिओचे युजर्स दिवसागणिक वाढतचं चालले आहेत. याचं कारण म्हणजे, जिओकडून आपल्या ग्राहकांना मिळणाऱ्या विविध फायदेशीर सुविधा. मोबाईल युजर्स कायम स्वस्त आणि मस्त प्लॅनच्या शोधात असतात. ज्यासाठी रिलायन्स जिओ प्रसिद्ध आहे. खासकरून स्वस्त वार्षिक योजनांसाठी.

रिलायन्स जिओ चांगल्या आणि दमदार ऑफर कायम देतात. यामध्ये ११ महिन्यांच्या रिचार्ज प्लॅनचा सुद्धा समावेश आहे. ज्याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जिओच्या सगळ्यात स्वस्त प्लॅन्सच्या यादीत हा ११ महिन्यांचा ८९५ रुपयांचा दीर्घ वैधता देणारा रिचार्ज प्लॅन सामील आहे. त्यामुळे जर तुम्हीही रिलायन्स जिओ सिम युजर आहात तर या स्वस्त वार्षिक रिचार्ज प्लॅनविषयीची ही बातमी चुकवू नका.

895 रुपयांचा रिचार्ज, 336 दिवसांची वैधता आणि भरपूर सुविधा (Jio Recharge Plan)

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना कायम विविध सुविधा देणारे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. त्यांपैकी एक म्हणजे जीओचा ८९५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३३६ दिवसांची दीर्घ वैधता मिळते. (Jio Recharge Plan) रिलायन्स जिओचा हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेसह 2 GB हाय-स्पीड डेटा ऑफर करतो.

मुख्य बाब सांगायची म्हणजे, या रिचार्ज प्लॅन अंतर्गत तुम्हाला २८ दिवसांची वैधता आणि 2GB डेटा १२ वेळा प्रदान केला जातो. म्हणजेच काय तर हा रिचार्ज प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना या अंतर्गत एकूण ३३६ दिवसांची दीर्घकालीन वैधता प्राप्त होते. ज्यामध्ये दरमहा 2GB डेटा दिला जातो. असा एकूण १२ वेळा म्हणजे 24 GB हायस्पीड डेटा ग्राहकांना दिला जातो.

तसेच या ८९५ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये केवळ चांगला डेटाच नाही तर तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर मोफत, अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधादेखील प्रदान केली जाते. रिलायन्स जिओचा हा स्वस्त प्लॅन तुम्हाला 24 GB हायस्पीड डेटा आणि कॉलिंग या सुविधांव्यतिरिक्त, २८ दिवसांसाठी फक्त ५० एसएमएस ऑफर करतो. (Jio Recharge Plan) या ८९५ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह, Jio TV आणि Jio Cinema तसेच Jio Cloud या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत प्रवेश दिला जाईल. म्हणजे फुल्ल टाइम एंटरटेनमेंट सुद्धा मोफत. त्यामुळे एकंदरच पाहिले असता जीओचा हा रिचार्ज प्लॅन बजेटनुसार चांगला आणि स्वस्त आहे.

प्रत्येक महिन्याला 82 रुपयेचं खर्च होणार..

जर तुम्ही या प्लॅनचा २८ दिवसांच्या सायकलचा कालावधी लक्षात घेतलात तर समजेल की, तुम्हाला अंदाजे ७५ रुपये खर्च करावे लागणार आहेत. तेच जर तुम्ही हा प्लॅन ३० दिवसांच्या सायकलप्रमाणे पाहिलात तर समजेल की, तुमचा ८१ रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे हा रिचार्ज प्लॅन अशा प्रत्येक युजरच्या फायद्याचा आहे ज्याला कमी पैशात दीर्घ कालावधीच्या सुविधा हव्या आहेत.

(Jio Recharge Plan) तसेच ज्या ग्राहकांकडे २ सिमकार्ड आहेत अशा ग्राहकांसाठी देखील हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. कारण हा रिचार्ज प्लॅन कमी बजेटमध्ये अधिक फायदे देणारा आहे. या रिचार्ज प्लॅनची सुविधा मिळवण्यासाठी तुम्ही जिओ ॲप किंवा पेटीएम वरून अगदी सहज रिचार्ज करू शकतो. त्यातूनही ऑफर सुरु असतील तर तुम्हाला सरप्राईज डाटा कुपन मिळण्याची शक्यता असते.