Jio World Garden : अंबानींच्या ‘जिओ वर्ल्ड गार्डन’मध्ये लग्न करायचंय? दिवसाचं भाडं आहे फक्त…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jio World Garden) मुकेश अंबानी यांच्या ‘जिओ वर्ल्ड गार्डन’मध्ये अनेक कार्यक्रम होतात हे आपण सारेच जाणतो. अत्यंत भव्य आणि जंगी स्वरूपातील सोहळे करण्यासाठी हे ठिकाण अगदी बेस्ट आहे. आता लग्नाचा सीजन सुरु झाला आहे. त्यामुळे बरेच मुहूर्त आहेत. काय सांगता? तुम्हीही लग्नाचा विचार करताय? पण मनासारखा हॉल किंवा लॉन मिळत नाहीये. तर मग मुकेश अंबानी यांच्या ‘जिओ वर्ल्ड गार्डन’चा विचार का करत नाही? होय. तुम्ही लग्न म्हणा किंवा इतर कोणताही मोठा सोहळा मुकेश अंबानी यांच्या गार्डनमध्ये करू शकता. यासाठी किती भाडं द्यावं लागेल, याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

जिओ वर्ल्ड गार्डन (Jio World Garden)

भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योजक म्हणून मुकेश अंबानी ओळखले जातात. मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी हे कायम त्यांच्या रॉयल लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. तशीच चर्चा त्यांच्या ‘जिओ वर्ल्ड गार्डन’चीदेखील सुरु आहे. हाय प्रोफाईल लोकांसाठी हे गार्डन विशेष आकर्षण आहे. सोशल मीडियावर कायम या गार्डनचे फोटो आणि गार्डनमध्ये पार पडलेल्या सोहळ्याचे फोटो व्हायरल होत असतात.

(Jio World Garden) त्यामुळे लग्न सोहळ्यासाठी हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय होत चालले आहे. मुंबईतील बीकेसीसारख्या ठिकाणी असलेलं हे गार्डन तुम्हीसुद्धा तुमच्या कार्यक्रमांसाठी बुक करू शकता. ते कसं? आणि त्याच किती भाडं द्यावं लागेल? याविषयी जाणून घेऊ.

भाडं किती?

जर तुम्हाला ‘जिओ वर्ल्ड गार्डन’मध्ये कोणताही कार्यक्रम करायची ईच्छा असेल तर तुम्हीदेखील हे गार्डन भाड्याने घेऊ शकता. माहितीनुसार, ‘जिओ वर्ल्ड गार्डन’मध्ये कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर यासाठी तुम्हाला १५ लाख रुपये भांड द्यावं लागणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा टॅक्स सामिल नसतो. (Jio World Garden) एवढंच नव्हे तर, कोणताही कार्यक्रम नसेल तर अगदी १० रुपये मोजून तुम्ही ‘जिओ वर्ल्ड गार्डन’ पाहू आणि फिरू शकता.

‘या’ सुविधा मिळतात

मुकेश अंबानी यांचे ‘जिओ वर्ल्ड गार्डन’ अत्यंत सुव्यवस्थित आणि योजनांनी परिपूर्ण आहे. या गार्डनमध्ये फार भव्य आणि महागड्या वस्तू पहायला मिळतात. इथे एकूण २ हजार गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. (Jio World Garden) तसेच या ठिकाणी इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटर हॉटेल, दोन मॉल, रुफटॉर ड्राईव्ह – इन मुव्ही थिएटर, कमर्शियल ऑफिस आणि वाय- फाय कनेक्टिव्हीटी यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत.