Jyoti Malhotra espionage case : “जासूस ज्योती”च्या कहाणीचा नवा ट्विस्ट ; ‘पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक विधान, बॉर्डरवर व्हिडीओ आणि पाकसोबत भाईचारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jyoti Malhotra espionage case : भारतातून पाकिस्तानसाठी गुप्तचरगिरी करणाऱ्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठरू शकणारी माहिती तिने तपास यंत्रणांना दिली असून, काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी तिचा संबंध असल्याचं संकेत मिळाले आहेत.

पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त विधान (Jyoti Malhotra espionage case)

जानेवारी महिन्यात ज्योतीने काश्मीर दौरा केला होता आणि त्या दरम्यान पहलगामसह विविध संवेदनशील ठिकाणी तिने व्हिडीओ शूट केले होते. तपासात समोर आले की, त्या कालावधीत ती पाकिस्तानी इंटेलिजन्स एजंट्स (PIOs) च्या संपर्कात होती. हल्ल्यानंतरच्या एका व्हिडीओत तिने म्हटलं की, “हल्ल्यासाठी आपणही जबाबदार आहोत. निगराणी ठेवली पाहिजे. दहशतवाद्यांना पाठींबा देणारा भारतीय असूच शकत नाही.”

बॉर्डरवर व्हिडीओ, पाकिस्तानशी मैत्रीचं प्रदर्शन

ज्योतीने राजस्थानमधील थार सीमेलगतच्या भागात बॉर्डरच्या अगदी जवळ जाऊन व्हिडीओ शूट केले होते. यामध्ये सीमावर्ती तारबंदी स्पष्टपणे दाखवण्यात आली होती, जी सुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे. त्यानंतर ती पहलगाममध्येही गेली होती, जिथे तिने कोणत्या व्यक्तींशी संपर्क केला आणि काय शूटिंग केलं, याची चौकशी गतीने सुरू आहे.

“मला भारत-पाकिस्तानमध्ये काही फरक वाटत नाही”

तिच्या पाकिस्तानशी संबंधित बहुतेक व्हिडीओंमध्ये तिने एकच विधान सतत केलं – “मला भारत आणि पाकिस्तानमध्ये काही फरक वाटत नाही.” एक व्हिडीओत ती एका पाकिस्तानी यूट्यूबर महिलेसोबत दिसते आणि म्हणते, “ही माझी बहीण आहे; आम्हाला ‘कोड ऑफ द इयर’ मिळायला हवा.” (Jyoti Malhotra espionage case)तिच्या बोलण्यातून आणि शरीरभाषेतून पाकिस्तानबद्दल असलेली सकारात्मक झुकते माप स्पष्ट दिसून आले आहे.

2024 मध्ये नागरिकाने NIA ला केले होते टॅग

मे 2024 मध्ये एक नागरिक ‘कपिल जैन’ यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वर NIA ला टॅग करत ज्योतीच्या संशयास्पद हालचालींकडे लक्ष वेधलं होतं. त्यांनी लिहिलं की, “ती आधी पाकिस्तानी दूतावासाच्या कार्यक्रमात गेली, नंतर 10 दिवस पाकिस्तानमध्ये होती आणि आता काश्मीरला जात आहे. यात काहीतरी साखळी आहे…” ही पोस्ट आता जोरात व्हायरल होत आहे.

मोबाईल, लॅपटॉप फॉरेन्सिक तपासणी

ज्योतीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपची सध्या फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. तिच्या कॉल डिटेल्स, सोशल मीडिया संपर्क, आणि बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहार तपासण्यात येत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “ज्योतीने अनेक वेळा पाकिस्तान, तर एकदा चीनलाही भेट दिली होती. तिच्या खर्चाचा थाट पाहता, ती कुठून फंडिंग घेत होती याचीही कसून चौकशी सुरू आहे.”

अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसरही संशयात

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीसोबत काही अन्य सोशल मीडिया इन्फ्लुएंसरही PIO च्या संपर्कात असल्याचं संकेतआहेत. हे लोक पाकिस्तानात होणाऱ्या सामाजिक आणि उच्चभ्रू कार्यक्रमांमध्येही सहभागी होत होते.

ही घटना आपल्याला सतर्क करते की, सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनापुरता नसून, देशविरोधी कृत्यांचं माध्यमही ठरू शकतो. म्हणूनच नागरिकांनी देखील सजग राहणं, आणि कुठल्याही संशयास्पद व्यक्तीच्या हालचालींबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती देणं, हे काळाची गरज आहे.