Jyoti Malhotra : होय ! दानिश सह इतर पाकिस्तानी गुप्तहेर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती; स्वतःच दिली कबुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jyoti Malhotra: गुप्तहेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या युट्युबर ज्योती मल्होत्रा सोबतची चौकशी, तपासणी सध्या सुरू आहे. या प्रकरणात आता एक मोठी आणि धक्कददायक माहिती समोर आली आहे. ज्योतीने अखेर पाकिस्तानच्या गुप्तहेर सोबत आपण संपर्कात असल्याची कबुलीत दिली आहे. एवढंच नाही तर तिने पाकिस्तानी उच्च आयोग अधिकारी यांच्यासोबत सुद्धा मी संपर्कात होते ही बाब स्वीकारली आहे. असं असलं तरी सध्या पोलिसांकडून याबाबतीत (Jyoti Malhotra) कोणतेही स्पष्टीकरण दिले गेलेले नाहीये. पोलिसांनी ज्योतीला 16 मे रोजी अटक केली होती.

दानिश सोबत संपर्कात (Jyoti Malhotra)

एका इंग्रजी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ज्योतीने कथित रूपात कबूल केलं आहे की पाकिस्तानी गुप्त अधिकाऱ्यांसोबत तिने संपर्क साधला होता. स्वीकार केले आहे की नवी दिल्ली येथे पाकिस्तानी उच्च आयोग अधिकारी दानिश सोबत ती नियमित बातचीत करीत होती.

दानिशला भारत सरकार कडून बाहेरचा रस्ता

मिळालेल्या माहितीनुसार तपासणी करत असताना एका रेकॉर्ड वरून समोर आले आहे की, ज्योतीची (Jyoti Malhotra) दानिश उर्फ अहसादार याच्यासोबत पहिल्यांदा 2023 साली भेट झाली होती. या काळातच ज्योती पाकिस्तान दौरा करण्यासाठी व्हिसा घेण्यासाठी पाकिस्तान उच्च आयोगात गेली होती. महत्त्वाची बाब ही आहे की पेहलगाम हल्ल्याच्या नंतर 13 मे ला दानिशला भारत सरकारने बाहेरचा रस्ता दाखवला होता.

माध्यमांच्या सूत्राने अशी ही माहिती सांगितली आहे की, ज्योतीने तपासा दरम्यान सांगितलं की, “2023 मध्ये मी पाकिस्तान दौरा केला यासाठी व्हिसा बाबत माहिती घेण्यासाठी दिल्लीमधील पाकिस्तान उच्च आयोगात गेलेहोते”. पुढे तिने सांगितलं की पाकिस्तान दौऱ्याच्या दरम्यान तिची भेट दानिशचा साथीदार अली हसन याच्यासोबत झाली होती. ज्याने पाकिस्तानात ज्योतीचा दौरा आणि राहायची व्यवस्था केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार ज्योतीने खुलासा केला आहे की हसनने तिची दोन लोकांसोबत भेट घालून दिली होती. जे पाकिस्तान से गुप्त अधिकारी मानले जातात. त्यांचे नाव शाकीर आणि राणा शहबाज असं सांगितलं गेलं आहे. ज्योतीने पुढे असंही सांगितलं की तिने शाकीरचा नंबर जट रंधावा या नावाने सेव केला होता. जेणेकरून कोणालाही याबाबतीत शंका येऊ नये.

भारतात परतल्यानंतर ती सतत पाकिस्तानच्या गुप्तहेर असलेल्या आधिकाऱ्यांसोबत संपर्कात होती. एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत व्हाट्सअप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम यासारख्या ऍपच्या माध्यमातून ती संपर्क साधत होती.