Kalki 2898 AD : वेळ आली आहे!! ‘कल्कि 2898 एडी’चा टीझर रिलीज; बिग बी साकारणार ‘अश्वत्थामा’ची भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalki 2898 AD) बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो कायम त्यांना विविध भूमिकांमध्ये पाहण्यासाठी आतुर असतो. त्यामुळे वयाच्या ८१ व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांना काम करण्याची विशेष ऊर्जा मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. अखेर या चित्रपटात अमिताभ बच्चन साकारत असलेल्या त्यांच्या भूमिकेचा पहिला लूक समोर आला आहे.

अमिताभ बच्चन साकारणार ‘अश्वत्थामा’ची भूमिका

‘कल्कि 2898 एडी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात अमिताभ बच्चन आपल्याला ‘अश्वत्थामा’च्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या नव्या भूमिकेतील पहिला लूक नुकताच समोर आला आहे. (Kalki 2898 AD)सोशल मीडियावर या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचा लूक रिलीज करण्यात आला आहे.



यासाठी एक पोस्टर आणि एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात ‘अश्वत्थामा’च्या भूमिकेत महानायक अमिताभ बच्चन यांचा अत्यंत कमालीचा आणि दमदार असा लूक पहायला मिळत आहे. या चित्रपटातील लूक स्वतः बिग बींनी शेअर केला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

बिग बींची पोस्ट

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपल्या नव्या सिनेमातील नवा लूक शेअर केला आहे.

यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हा माझ्यासाठी दुसरा अनुभव आहे.. अशा उत्पादनाचा विचार करण्याची मानसिकता, आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्ट्रॅटोस्फेरिक सुपर स्टार असलेल्या सहकाऱ्यांची सोबत आणि उपस्थिती’.

सिनेमाचा टिझर (Kalki 2898 AD)

या वर्षीचा सर्वात मोठा चित्रपट म्हणून ‘कल्कि 2898 एडी’ चर्चेत आहे. दरम्यान अमिताभ बच्चन एका नव्या आणि अनोख्या भूमिकेत दिसणार म्हणून विशेष उत्सुकता होती. (Kalki 2898 AD) चित्रपटाच्या टीझरमध्ये अमिताभ बच्चन आणि एका लहान मुलांचे संवाद दाखवले आहेत. या टीझरमध्ये अमिताभ यांचे संपूर्ण शरीर पांढऱ्या कापडाच्या पट्टीने झाकलेले दिसते. केवळ डोळे उघडे दिसतात’.

‘ते शिवलिंगाची पूजा करत असताना एक मुलगा त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, ‘हाय… मी राया आहे’. यानंतर तो त्यांना बरेच प्रश्न विचारतो. यावेळी त्यांच्या कपाळातून रक्त येतं आणि मुलगा विचारतो, ‘तू देव आहेस?’ यावर ते म्हणतात, ‘आता वेळ आली आहे, माझ्या शेवटच्या युद्धाची’. यानंतर ते अश्वत्थामाची ओळख सांगतात. (Kalki 2898 AD) यातील लहान मुलगा तेलुगूमध्ये तर अमिताभ हिंदीत बोलताना दिसतात. हा टिझर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.