Kamleshwar Temple Uttarakhand : भारतातील ‘या’ प्राचीन मंदिरात नवस केल्याने होते पुत्रप्राप्ती; काय सांगते आख्यायिका?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kamleshwar Temple Uttarakhand) देशभरात अनेक प्राचीन आणि पुरातन मंदिरे आहेत. ज्यांचा इतिहास आणि आख्यायिका ऐकून अगदी थक्क व्हायला होत. यातील काही मंदिरांचा इतिहास हा फारच प्राचीन आणि पुरातन आहे. ज्याचा काही ग्रंथ आणि पुराणांमध्ये देखील उल्लेख आहे. अशाच मंदिरांपैकी एका खास मंदिराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या मंदिरात लोक एक खास नवस करण्यासाठी येतात. तो म्हणजे पुत्रप्रातीचा नवस. विशेष असे की, इथे केलेले नवस पूर्ण देखील होतात. चला तर या प्रचिंग मंदिराविषयी अधिक माहिती घेऊया.

कुठे आहे हे मंदिर? (Kamleshwar Temple Uttarakhand)

उत्तराखंडच्या श्रीनगर गढवाल येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यामध्ये भगवान कमलेश्वराचे मंदिर आहे. जिथे दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी अपत्यप्राप्तीची इच्छा घेऊन अनेक निपुत्रिक जोडपी मोठ्या श्रद्धेने उपस्थित असतात. असं म्हणतात की, भगवान कमलेश्वराच्या दरबारात येणाऱ्या निपुत्रिक जोडप्यांनी पूर्ण श्रद्धेने पुत्रप्राप्तीचा नवस केला तर त्यांची इच्छा पूर्ण होते. त्यासाठी येथील काही धार्मिक श्रद्धांनुसार तपश्चर्या करावी लागते, असे सांगितले जाते.

पौडीच्या श्रीनगरमध्ये महादेवाचे हे मंदिर आहे. या मंदिराविषयी सांगितले जाते की, रावणाचा वध केल्यानंतर गुरु वशिष्ठांच्या आज्ञेनुसार श्री राम कमलेश्वर मंदिरात भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आले. (Kamleshwar Temple Uttarakhand) या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी १०८ कमळांनी भगवान शंकराची पूजा केली होती. त्यानंतर या स्थानाला कमलेश्वर असे नाव पडले. अचला सप्तमी, महाशिवरात्री आणि बैकुंठ चतुर्दशीला या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. येथे दूरवरून निपुत्रिक जोडपी देवाकडे पुत्रप्रातीचा नवस बोलण्यासाठी येतात.

‘असा’ केला जातो नवस

इथे बरेच भाविक फार दुरून येतात. तर अपत्यहीन जोडपी देवाकडे पुत्रप्राप्तीचा नवस करण्यासाठी येतात. हा नावर करण्यासाठी येणारी जोडपी हातात जळता दिवा ठेवून रात्रभर नामजप आणि जागर करतात. (Kamleshwar Temple Uttarakhand) तसेच सकाळी अलकनंदात दीप प्रज्वलित करून मंदिरात देवाची पूजा करतात. येथील धार्मिक श्रद्धेनुसार दिवा लावून तपश्चर्या केल्याने निपुत्रिक जोडप्यांची अपत्यप्राप्तीची मनोकामना पूर्ण होते.

आख्यायिका

असे सांगितले जाते की, सतयुगात भगवान विष्णूंनी शिवाला हजार कमळ अर्पण केले आणि सुदर्शन चक्र प्राप्त केले होते. तर त्रेतायुगात प्रभू श्री रामांनी ब्रह्मदेवाच्या हत्येच्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिवाला १०८ कमळ फुले अर्पण केली होती. तसेच द्वापर युगात, कृष्णाने जामवंतीच्या आज्ञेनुसार उभे राहून दिव्याचा उपवास केला होता. (Kamleshwar Temple Uttarakhand) त्यानंतर त्यांना ‘स्वम’ नामक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यामुळे कलियुगात प्रतिवर्षी कार्तिक शुक्ल चतुर्दशीला अर्थात वैकुंठ चतुर्दशीदिवशी अनेक निपुत्रिक जोडपी येथे संतती प्राप्तीसाठी नवस बोलतात. तसेच महाशिवरात्री, माघ शुक्ल पक्ष सप्तमी, अचला सप्तमी (घृत कमल पूजा) या दिवशीदेखील कपालेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते.

कमलेश्वर मंदिरात कसे जाल?

कपालेश्वर मंदिरापासून १५१ किलोमीटर अंतरावर जॉलीग्रांट विमानतळ आहे. इथपर्यंत येऊन पुढे तुम्ही टॅक्सी वा बसने मंदिरापर्यंत जाऊ शकता. तसेच येथून सर्वात जवळ १०४ किलोमीटर अंतरावर ऋषिकेश रेल्वे स्टेशन आहे. याशिवाय श्रीनगर गढवाल हे उत्तराखंडच्या इतर जिल्ह्यांशी रस्त्याने जोडलेले आहे. (Kamleshwar Temple Uttarakhand) त्यामुळे डेहराडून, हरिद्वार आणि ऋषिकेश येथून तुम्ही कमलेश्वर मंदिरासाठी टॅक्सीने देखील प्रवास करू शकता.