Karad Passenger : कमी पैशामध्ये सुलभ प्रवास म्हणजे रेल्वेचा प्रवास… दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नोकरी आणि उद्योग धंद्यासाठी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर ही ट्रेन खूप महत्वाची भूमिका बजावते. कराड येथील रेल्वे बद्दल बोलल्याचं झाल्यास काही वेगळे चित्र नाही कऱ्हाडपासून (Karad Passenger) आसपास सातारा , सांगली , मिरज , हातकणंगले,कोल्हापूर अशा भागात पॅसेंजर ने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याच कराड च्या पॅसेंजर साठी आता आनंदाची बातमी आहे. कारण कऱ्हाड – रेल्वेच्या पॅसेंजर गाड्यांना असलेले दर आज पासून पूर्ववत करण्यात आले आहेत.
मध्यंतरी कोरोना साथीच्या संसर्गानंतर पॅसेंजर (Karad Passenger) चे भाडे वाढवण्यात आले होते. आता आजपासून पुन्हा हे भाडे पूर्ववत करण्यात आले आहेत. कोल्हापूर मिरज सांगली सातारा पर्यंत धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्यांना आता पूर्वीचे दर लागू होणार आहेत.
कोरोना काळानंतर झालेली दरवाढ कमी करण्यासाठी देशभरातून विविध रेल्वे प्रश्न मांडणारे संघटना खासदार लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने रेल्वे बोर्डाकडे मागणी केली होती. या मागणीचा विचार करून केंद्रीय रेल्वे बोर्डांन(Karad Passenger) काल उशिरा सर्व विभागांना दर पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या तसेच त्याची अंमलबजावणी तातडीने आजपासूनच करण्याची सूचना दिली होती.
कराड – कोल्हापूर प्रवास केवळ ३० रुपयांत
त्यानुसार आज पासून सर्व पॅसेंजर गाड्यांना पूर्ववत दराप्रमाणे तिकीट उपलब्ध करण्यात येणार असून कराड ते कोल्हापूर आतापर्यंत असणारे साठ रुपये ऐवजी फक्त तीस रुपयांमध्ये हा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी केले आहे
काय आहेत नवे दर
कऱ्हाडवरुन कोल्हापूर – ३० रुपये
कऱ्हाड – हातकणंगले – २५ रुपये
कऱ्हाड – मिरज – २० रुपये
कऱ्हाड – सांगली – २० रुपये
कऱ्हाड – किर्लोस्करवाडी – १० रुपये
कऱ्हाड – भिलवडी – १५ रुपये
कऱ्हाड – ताकारी – १० रुपये
कऱ्हाड – कोरेगाव – १५ रुपये
कऱ्हाड – रहीमतपूर – १० रुपये
कऱ्हाड – सातारा – २० रुपये
कऱ्हाड – वाठार – २५ रुपये
कऱ्हाड – निरा – ३० रुपये
कऱ्हाड – लोणंद – ३० रुपये
कऱ्हाड – जेजूरी – ३५ रुपये
कऱ्हाड -पुणे -४५ रुपये