Kashi Vishwanath Donation : काशी विश्वनाथ मंदिराला भाविकांकडून दिल्या जाणाऱ्या देणग्या दिवसेंदिवस नवनवे विक्रम निर्माण करत आहेत. मंदिराच्या तिजोरीत आतापर्यंत भाविकांनी 7 कोटींहून अधिक दान केले आहे. सोन्या-चांदीच्या काही हुंडे आणि देणग्या मोजणे अद्याप बाकी असले तरी या आकड्याने नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
मंदिर प्रशासनाने महा कुंभच्या दरम्यान येणाऱ्या भाविक भक्तांची सुविधा (Kashi Vishwanath Donation) लक्षात घेता या मंदिरात येणाऱ्यांची तिकीट थांबवण्यात आली होती. तरी देखील भाविकांनी भरभरून दान दिले आहे. त्यामुळे दानामध्ये मोठी भर पडली आहे. हे दान काशी विश्वनाथ मंदिरासाठी एक महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.
अद्याप पूर्ण मोजणी नाहीच (Kashi Vishwanath Donation)
या मंदिराचे एसडीएम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, महाकुंभ नंतरही येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये काही कमी होत नाहीये. कॉरिडोर तयार केल्यानंतर देखील भाविकांच्या गर्दीमध्ये वाढ होतानाच दिसत आहे. मागच्या दीड महिन्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक दीड करोड भाविकांनी इथे येऊन दर्शन घेतलेले आहेत. दर्शन करताना भाविकांना कोणत्याही समस्येला सामोरे जाऊ नये म्हणूनच जागरूकतेसाठी मंदिर मध्ये मिळणारी तिकीट काही काळ बंद करण्यात आली होती. त्यांनी पुढे सांगितले की, जरी तिकीट बंद करण्यात आली असली तरी सुद्धा भाविकांनी (Kashi Vishwanath Donation) भरभरून दान दिले आहे.
त्याने सांगितलं की, मागच्या महिन्यापासून आतापर्यंत भाविकांनी तब्बल सात करोड रुपये दान केले आहेत. अद्यापही याची पूर्ण मोजणी होणं बाकी आहे. सध्या जास्त गर्दी असल्यामुळे अद्यापही या दानाची मोजणी पूर्ण झालेली नाही. जसजशी गर्दी कमी होईल तसं तसे आम्ही पुन्हा काउंटिंग सुरू करू आणि फायनल काउंटिंग झाल्यानंतर दानाची उर्वरित रक्कम किती आहे हे सुद्धा पुढे येईल अशी माहिती या मंदिराच्या (Kashi Vishwanath Donation) एसडीएम ने दिली आहे.