Katra Srinagar Vande Bharat Express : आता रेल्वेनेच वैष्णो देवी दर्शनानंतर थेट श्रीनगरची सैर! मोदींच्या हस्ते ‘या’ तारखेपासून सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Katra Srinagar Vande Bharat Express : देशभरातील भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता माता वैष्णो देवीचे दर्शन घेतल्यानंतर थेट काश्मीरपर्यंतचा प्रवास रेल्वेने शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जून रोजी कटऱ्याहून श्रीनगरकडे जाणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या ऐतिहासिक रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर उत्तर भारतातील धार्मिक आणि पर्यटन यात्रा अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे.

दरवर्षी देशभरातून सुमारे एक कोटी भाविक माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यातील अनेक जण काश्मीर पाहण्यासाठी इच्छुक असतात, मात्र कटऱ्यापुढे रेल्वेसेवा नसल्यामुळे ते परतीचा मार्ग धरतात. ही अडचण आता दूर होणार असून, कटऱ्यापासून थेट श्रीनगरपर्यंत रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

काश्मीरला पर्यटनाला चालना (Katra Srinagar Vande Bharat Express )

या नव्या वंदे भारत मार्गामुळे केवळ भाविकांना नव्हे, तर काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. गेल्या काही काळात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे थोडीशी मरगळ आलेली असली, तरी आता रेल्वेसेवेमुळे पुन्हा एकदा काश्मीर पर्यटकांनी गजबजण्याची शक्यता आहे. याशिवाय ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्री अमरनाथ यात्रेदरम्यान भोलेबाबाच्या भक्तांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. भाविकांना श्रीनगरपर्यंत आरामदायी आणि वेगवान प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

वंदे भारतमुळे व्यवसाय आणि स्थानिकांना थेट लाभ

नवीन रेल्वेमार्गामुळे जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनाही थेट फायदा होणार आहे. स्थानिक बाजारपेठा, हॉटेल व्यवसाय, टॅक्सी सेवा आणि पर्यटनाशी संबंधित अनेक क्षेत्रांना नवसंजीवनी मिळणार आहे.

गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई फक्त 40 मिनिटांत? सुरु होतेय वॉटर टॅक्सी

सुरक्षा व्यवस्था कडक

पंतप्रधान मोदींच्या ६ जूनच्या कटरा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. कटरा रेल्वे स्थानक परिसरात विशेषरित्या तयार केलेला हेलीपॅड अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून, रेल्वे स्थानकावर रंगरंगोटी करून परिसर झळाळून निघाला आहे.

सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासन अत्यंत सतर्क असून, कटरा-श्रीनगर रेल्वे ट्रॅकवर सुरक्षा जवानांची कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पीएम मोदींचे भाषण श्राइन बोर्डच्या स्टेडियममध्ये होणार असल्यामुळे तेथील लोकांची वर्दळ सुद्धा बंद करण्यात आली आहे.काश्मीर आणि कटऱ्याला जोडणारी ही वंदे भारत सेवा केवळ धार्मिकच नव्हे, तर आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही क्रांतिकारी पाऊल आहे. यामुळे संपूर्ण उत्तर भारताला आणि विशेषतः जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाला नवीन बळ मिळणार आहे.