KBC 16: “देवियो और डायलॉग सज्जानो …! तैय्यार हो जाईये मेरे साथ खेलीये ‘कौन बनेगा करोडपती’ ” महानायक अमिताभ बच्चन यांचे हे डायलॉग ऐकण्यासाठी तुमचे सुद्धा कान आतुर झाले असतील. तर तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण लवकरच सुरु होत आहे ‘कौन बनेगा करोडपती’ चा 16वा सिझन तुमहाला देखील या भागामध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल तर रजिस्ट्रेशन सुरु झालेले आहे. चला जाणून घेऊया या नव्या (KBC 16) सिझन बद्दल…
हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘कौन बनेगा करोडपती सीझन 16’ चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये बिग बींचा नवीन अंदाज पाहायला मिळत आहे. प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांना ‘KBC 16’ कधी आणि कुठे पाहता येईल हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. या सीझनमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी घडणार आहेत, ज्याची झलक प्रोमोमध्येही पाहायला (KBC 16) मिळेल.
प्रोमोमध्ये बिग बींची नवी स्टाईल (KBC 16)
‘कौन बनेगा करोडपती सीझन 16′ पुढील महिन्यात 12 ऑगस्ट रोजी प्रीमियर होणार आहे.’जिंदगी है, हर मोड़ पर सवाल पूछेगी, जवाब तो देना होगा’ अशी या सीझनची टॅगलाइन आहे, हा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. सोनी टीव्हीचा रिॲलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोला खूप मजबूत फॅन फॉलोइंग आहे.सर्व वयोगटातील लोकांना हा शो पाहायला (KBC 16) आवडतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रेक्षक त्याच्या 16व्या सीझनची वाट पाहत आहेत जो लवकरच येत आहे.
‘KBC 16’ कधी आणि कुठे पाहू शकता? (KBC 16)
तुम्ही ‘कौन बनेगा करोडपती सीझन 16’ 12 ऑगस्ट, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर पाहू शकता. ‘कौन बनेगा करोडपती’ हा भारतातील सर्वात लोकप्रिय टीव्ही गेम शो आहे. या शोचा प्रीमियर 2000 साली झाला. ‘केबीसी’साठी 26 एप्रिल रोजी रात्री 9 वाजल्यापासून (KBC 16) नोंदणी सुरू झाली. यानंतर, स्पर्धकांची निवड झाल्यानंतर, शो प्रसारित केला जाईल.
कशी कराल नोंदणी? (KBC 16)
- या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये ‘सोनी लिव ॲप’ डाऊनलोड करावे लागेल.
- आता तुम्हाला केबीसी रजिस्ट्रेशन वर जाऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
- प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर जी काही प्रोसेस दिली जाईल ती पूर्ण करावी लागेल.
- यानंतर रजिस्ट्रेशन कन्फर्म झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर त्याबाबतचा मेसेज येईल.
SMS द्वारे नोंदणी (KBC 16)
यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन केबीसी लिहावं लागेल. त्यानंतर स्पेस देऊन रजिस्टर करताना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे वय आणि लिंग 50 90 93 या क्रमांकावर पाठवावे लागेल. याशिवाय http://www.sonyliv.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता.
यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि तुमचे उत्तर बरोबर असेल तर तुमची निवड केली जाईल त्यानंतर इथे पोहोचल्यानंतर ही 11 जणांची निवड केली जाईल या 11 लोकांना सर्वात फास्टेस्ट फिंगर फर्स्ट प्रश्न विचारला जाईल जो कमीत कमी वेळेत अचूक उत्तर देऊ शकेल त्याला अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते.