Kidney Failure : ‘या’ पदार्थांच्या सेवनामूळे वाढतो किडनी फेलचा धोका; ताबडतोब खाणे बंद करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kidney Failure) आपल्या दैनंदिन आहारात आपण नकळत अशा पदार्थांचे सेवन करतो, ज्यामुळे तब्येतीच्या कुरबुरी सुरु होतात. काही पदार्थांमध्ये असे घटक समाविष्ठ असतात ज्यामुळे ‘किडनी स्टोन’ होतो. आता त्यांच्याविषयी माहिती असेल तर गोष्ट वेगळी. पण माहित नसेल तर साहजिकपणे आपण अशा पदार्थांचे सेवन करतो. तर आज आपण असे या पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचे सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या उदभवू शकते. ही माहिती जाणून घेतल्यास आपण आपल्या आहारात अशा पदार्थांचे समावेश टाळू शकतो आणि आपल्या किडनीचा बचाव करू शकतो.

‘या’ पदार्थांमुळे होतो किडनी स्टोन (Kidney Failure)

कॅल्शियम, ऑक्सलेट, युरेट, सिस्टिन, झेंथाइन आणि फॉस्फेट हे घटक आपल्या शरीरात किडनी स्टोनची निर्मिती करतात. यांचे सेवन वाढल्याने किडनी फेलसुद्धा होऊ शकते. त्यामुळे वेळीच कॅल्शियम ऑक्सलेट आणि प्युरिन समाविष्ट असलेले पदार्थ खाणे टाळायला हवे. किडनी स्टोन हा शारीरिक आणि मानसिक दोन्हीप्रकारे त्रास देतो. त्यामुळे आपल्या आहारात केवळ शारीरिक ऊर्जा देणारे नव्हे तर मानसिक बळ वाढवणारे पदार्थ समाविष्ट करायला हवेत आणि मुख्य म्हणजे जे पदार्थ किडनी स्टोनचा धोका वाढवतात ते खाणे टाळायला हवे.

आपण प्रामुख्याने कॅल्शियम ऑक्सिलेट फूड खाणे टाळायला हवे. यामध्ये भुईमूग, चॉकलेट, रताळे, बीटरूट, पालक, सोयाबीन यांचा समावेश आहे. (Kidney Failure) तसेच प्युरीन फूडदेखील खाणे टाळायला हवे. ज्यामध्ये मिठाई, हाय फ्रक्टोज, दारू, सी फूड आणि रेड मिट यांचा समावेश होतो.

किडनी स्टोन टाळायचा असेल तर काय कराल?

ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना किडनी स्टोन्सचा धोका जास्त असतो. कारण, घामावाटे शरीरातील पाणी कमी होते. ज्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते आणि अपरिणामी शरीराचे नुकसान करणारे घटक शरीराबाहेर पडत नाहीत. अशावेळी पुरेसे पाणी पिण्याची गरज असते. (Kidney Failure) म्हणून,

  • नियमितपणे कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी प्यावे.
  • दुसरे म्हणजे, जास्त प्रमाणात ऑक्सलेटचा समावेश असलेले पदार्थ खाणे टाळा.
  • तसेच जास्त प्रमाणात प्युरीनचा समावेश असलेले पदार्थदेखील आहारात खाणे टाळा.
  • आपल्या रोजच्या जेवणात मिठाचे सेवन कमी करा.
  • जेवणात मीठ कमी असल्यास वरून घेणे टाळा.
  • आवश्यकतेपेक्षा जास्त ‘व्हिटॅमिन सी’चे सेवन करू नका. (Kidney Failure)