हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kisan Vikas Patra Scheme) गेल्या काही काळात लोकांना गुंतवणुकीचे महत्व चांगले पटले आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेक उत्तम आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. ज्यातील बरेच पर्याय हे गुंतवणूक केलेला पैसे दुप्पट करण्याची चांगली संधी देतात. गुंतवणूक करायची म्हटली की, सर्वात आधी सुरक्षा आणि हमखास परतावा याचा विचार केला जातो. हे घटक लक्षात घेता गुंतवणूकदार आवर्जून सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. खास करून पोस्टाच्या योजना गुंतवणूकदारांची पहिली पसंती असल्याचे समोर आले आहे.
अशातच गुंतवणुकीतून हमखास परतावा मिळेल आणि तितकीच सुरक्षा प्रदान करणाऱ्या एका योजनेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. (Kisan Vikas Patra Scheme) पोस्टाच्या योजनांना गुंतवणूकदार पसंती देतात कारण इथे निश्चित परतावा मिळतो. आज आपण ज्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत त्या योजनेत न केवळ निश्चित परतावा तर गुंतवलेले पैसे डबल म्हणजेच दुप्पट करण्यासाठी सरकार मदत करते. आता ही योजना कोणती आणि ती कशी फायदा देते? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिसची योजना (Kisan Vikas Patra Scheme)
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून बऱ्याच योजना चालवल्या जातात. त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना होय. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यास हमखास परतावा मिळतो. शिवाय पैशांची हमी सरकार स्वतः घेत. या योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. तसेच किसान विकास पत्र योजनेची खासियत सांगायची म्हणजे, यामध्ये खाते सुरु करणे फार सोपे आहे.
पैसे करता येतील दुप्पट
समजा तुम्ही या योजनेमध्ये तुमच्या कमाईतील ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला १० लाख रुपये मिळतात. मात्र, यासाठी तुम्हाला योजनेच्या काही नियम आणि अटींचे पालन करणे गरजचे आई. (Kisan Vikas Patra Scheme) तसे न केल्यास ही योजना तुम्हाला काहीच फायदा देऊ शकणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर किसान विकास पत्र योजनेतून दुप्पट परतावा मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमची गुंतवलेली रक्कम ९ वर्ष ७ महिने अर्थात ११५ महिन्यांसाठी गुंतवावी लागेल. अर्थात तुम्ही गुंतवणूक केलेले पैसे हे ११५ महिन्यांनी दुप्पट होतील. तसेच या योजनेत तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर ७.५% दराने परतावा मिळेल.
कोणाला मिळेल लाभ?
सगळ्यात महत्वाचे सांगायचे झाले तर, किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला खाते उघडता येणे शक्य नाही. यामध्ये तुम्ही संयुक्त खाते उघडू शकता. समजा, एखाद्या मुलाचे वय १० वर्षापेक्षा जास्त असेल तर तोसुद्धा या योजनेचा भाग होऊ शकतो. (Kisan Vikas Patra Scheme)
कोणती कागदपत्रे लागतात?
किसान विकास पत्र योजनेमध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे गरजची आहेत. यामध्ये आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट फोटो, किसान विकास पत्र एप्लीकेशन फॉर्म इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
मॅच्युरिटीआधी पैसे काढता येतील का?
किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यानंतर जर तुम्हाला काही कारणास्तव योजनेच्या मॅच्युरिटी आधी पैसे काढायचे असतील तर तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल. तुम्ही गुंतवणूक सुरु केल्याच्या तारखेपासून २ वर्ष ६ महिन्यानंतर तुम्ही या योजनेचा परिपक्व कालावधी पूर्ण होण्याआधी काही रक्कम काढू शकता. (Kisan Vikas Patra Scheme)