हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kitchen Hacks) चहा हा अनेकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा महत्वाचा भाग असतो. कित्येक लोक अगदी बेडवरच चहा पिणे पसंत करतात. तर काही लोक दिवसभरात तीन ते चार वेळा तरी चहाचे सेवन करतात. प्रत्येक चहा बनवताना वापरली जाणारी चहापत्ती ही चहा गाळून झाला की, फेकून दिली जाते. साहजिक आहे तुम्हीही हेच करत असाल. पण ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही चहापत्ती फेकून देणार नाही याची आम्ही तुम्हाला पूर्ण खात्री देतो. होय. कारण गाळून वेगळी केलेली चहापत्ती तुम्ही भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. कशी? चला जाणून घेऊया.
उरलेल्या चहापत्तीचा वापर (Kitchen Hacks)
चहा गाळून झाल्यानंतर गाळणीत उरलेली चहापत्ती पुन्हा काय उपयोगी पडणार? म्हणून आपण ती कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. पण गाळणीत उरलेली चहापत्ती फेकून न देता तिचा वापर काचेची भांडी वापरण्यासाठी करता येतो, हे फार कमी लोकांना माहित आहे. बऱ्याचदा काचेच्या भांड्यांवर पडलेले काळे, पिवळे डाग कालांतराने आणखी हट्टी झालेले दिसतात. हे डाग काही केल्या जाण्याचे नाव घेत नाहीत. अशावेळी तुम्ही चहा गाळून उरणारी चहापत्ती असते तिचा वापर करून हे डाग नक्कीच काढू शकता.
काचेची भांडी होतील चकाचक
काचेची भांडी घासण्यासाठी चहापत्तीचा वापर करायचा असेल तर त्यासाठी चहाचा गाळ पाण्याने धुवून घ्या आणि त्यातून निघालेले पाणी टाकून द्या. (Kitchen Hacks) त्यानंतर ही चहापत्ती काचेच्या भांड्यावर घासा. असे केल्याने काचेच्या भांड्यावरील सर्व डाग निघून जातील.
आरसा होईल लख्ख
फक्त काचेची भांडी नव्हे तर चहापत्तीचा वापर तुम्हाला आरसा स्वच्छ करण्यासाठीसुद्धा होईल. (Kitchen Hacks) बऱ्याचवेळा आरशावर पाण्याचे किंवा धुळीचे डाग पडतात. ते स्वच्छ करण्यासाठी देखील तुम्ही चहापत्तीचा वापर करू शकता.
बेसिन सिंक होईल स्वच्छ
जर तुमच्या बेसिन सिंकमध्ये लिंबाचे किंवा इतर कोणतेही डाग पडले असतील तर त्या ठिकाणी चहापत्ती घासा. असे केल्यास कितीही घट्ट डाग असले तरीही झटक्यात निघून जातील. (Kitchen Hacks)