Kitchen Hacks : स्विचबोर्डवर कांदा चोळून तर बघा; परिणाम पाहून चकित व्हाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kitchen Hacks) स्वयंपाकघर म्हटलं की, इथे कांदा- टोमॅटो हे पदार्थ तर असणारचं. प्रत्येक घराघरात अन्नपदार्थ बनवतेवेळी वापरले जाणारे हे पदार्थ एखाद्या किचन जुगाडसाठी वापरले जाऊ शकतात याचा कधी विचार केलाय का? आतापर्यंत तुम्ही कांदा टोमॅटोचा वापर प्युरी बनवण्यासाठी केला असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या पदार्थांमध्ये असलेली जादू समजेल. सामान्यपणे जेवणात वापरले जाणारे बरेच पदार्थ अत्यंत चमत्कारिक लाभ देणारे असतात. असाच काहीसा चमत्कार कांदा करू शकतो.

किचन जुगाड (Kitchen Hacks)

जेवणात वापरला जाणारा कांदा कधी स्विचबोर्डला लावून पाहिलाय का? आता हे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आश्चर्यचकीत होऊ नका. कारण स्विचबोर्डवर कांदा लावल्यानंतर काय कमाल होते ते पाहून तुम्ही आणखीच थक्क होणार आहात. महिला आपल्या घरातील साफसफाई अगदी व्यवस्थित करतात. मात्र तरीसुद्धा कुठे न कुठे धूळ राहतेच. खास करून स्विच बोर्डवर जमा होणारी धूळ कालांतराने चिकट होते आणि ती निघत नाही. अशावेळी तुम्हाला कांदा मदत करेल. कसा? ते पहा.

घर घर का झंझट खत्म मिलेगी राहत ही राहत II kitchen Tips II money saving tips

व्हायरल व्हिडीओ

या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, कांद्याचा थोडासा भाग कापून घ्या किंवा मग कांद्याचा वरचा भाग घ्या आणि तो स्विचबोर्डवर चोळा. त्यानंतर कोरड्या कपड्याने हा स्विचबोर्ड पुसून घ्या. कांद्यामधील द्रव्य पदार्थाच्या साहाय्याने तुम्ही स्विचबोर्डवर लागलेली धूळ काही सेकंदात काढू शकता. आहे ना चकित करणारा किचन हॅक (Kitchen Hacks). व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्विचबोर्ड पहाल तर लक्षात येते की, आधी या स्वीचबोर्डवर काही डाग होते. पण कांद्याच्या वापरानंतर ते डाग गायब झाले आणि तो चकचकीत झाला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडिया युट्युबवर Indian Vlogger Pinki नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून बऱ्याच लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओत इतरही काही ट्रिक्स सांगण्यात आल्या आहेत. (Kitchen Hacks)