Kitchen Tips : चहात साखर नाही टाल्कम पावडर टाका आणि पहा अवघड काम कसे सोपे होईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडीओ मनोरंजक तर कधी फायदेशीर असतात. आज आपण सोशल मीडियावर असलेल्या अशाच एका व्हिडीओ बद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गृहपयोगी एक सोपी ट्रिक (Kitchen Tips) सांगितली आहे.

खरे तर आपण आपल्या घराची स्वच्छता (Kitchen Tips) करण्यासाठी अनेक ट्रिक्स वापरत असतो. दारे ,खिडक्या साफ करण्यासाठी अनेक घरांमध्ये व्हॅक्युम क्लीनर सर्रास वापरले जातात मात्र प्रत्येकाच्या घरी व्हॅक्युम क्लीनर असतेच असे नाही. मग विशेषतः काचा (Kitchen Tips) साफ करण्यासाठी वेगवेळ्या केमिकलस वापरत असतो. पण काचेवर डाग हे दिसतातच. मात्र आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशी एक घरगुती ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या काचा चकाचक होतील. चला तर मग जाणून घेऊया.

आपण चेहऱ्याला टेलकम पावडर (Kitchen Tips) नेहमी लावतो पण या टेल्कम पावडर चा असा उपयोग यापूर्वी तुम्ही कधीच केला नसेल. चहा मध्ये हे टेल्कम पावडर टाकू शकतो आणि तुमच्या काचा चकचकीत करू शकतो. आता ही प्रक्रिया नक्की काय आहे? आणि ती कशी करायची हे जाणून घेऊया…

  • एका भांड्यात पाणी गरम करा.
  • यामध्ये चहा पावडर टाका.
  • हे पाणी उकळून घ्या.
  • त्यानंतर हे पाणी गाळून घ्या.
  • आता त्यात चेहऱ्यावर लावण्याची टेलकम पावडर टाका.
  • हे मिश्रण थंड झाले की या मिश्रनाणे काचा, आरसे स्वच्छ (Kitchen Tips) करू शकता.