Kitchen Tips : आपल्या प्रत्येकाच्या घरी पाण्याच्या बाटल्या हमखास असतातच. शिवाय आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटल्यांची जास्त गरज भासते. आपल्याकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वापरतात. त्या शक्यतो प्लास्टिक, आणि मेटल च्या बॉटल्स असतात. मात्र बऱ्याचदा यामध्ये पाणी राहून राहून याला घाण वास (Kitchen Tips) सुटायला लागतो.
बऱ्याचदा या बॉटलस (Kitchen Tips) सोयीनुसार वापरल्या तर जातात. पण त्याची हवी तशी स्वच्छता केली जात नाही. त्याच्या आकारामुळे बाटल्या साफ करणे अवघड होऊन जाते. बाजारात बाटल्या साफ करण्यासाठी ब्रश मिळतात मात्र ते सर्वांकडे असतीलच असे नाही म्हणून आज आम्ही बाटली साफ करण्यासाठीचे काही उपाय घेऊन आलो आहोत ज्यामुळे बाटली (Kitchen Tips) सहज स्वच्छ होईल.
बेकिंग सोडा
सोडा बायकार्बोनेट किंवा बेकिंग सोडा हे आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात प्रभावी स्वच्छता एजंटांपैकी एक आहे. कडक डागांपासून ते दुर्गंधीपर्यंत, हे सर्व आणि बरेच काही सहजतेने दूर करू शकते. तुमच्या पाण्याच्या बाटलीमध्ये (Kitchen Tips) फक्त एक चमचा बेकिंग सोडा घाला आणि पाण्याने भरा. त्याला चांगले शेक करा आणि रात्रभर तसेच भिजू द्या. दुसऱ्या दिवशी व्यवस्थित स्वच्छ धुवा आणि फरक पहा!
व्हिनेगर
यावर विश्वास ठेवा किंवा नाही, तीव्र वास असलेला व्हिनेगर तुमच्या पुन्हा वापरता येण्याजोग्या (Kitchen Tips) बाटलीतील वासांसाठी उत्तम उतारा असू शकतो. तुमच्या पाण्याच्या बाटलीमध्ये थोड्या प्रमाणात घाला (भरलेले १ टोपण पेक्षा जास्त नाही) आणि थोडे पाणी घालून डायल्युट करा. थोडावेळ हे मिश्रण बाटलीत असेच राहू द्या. नंतर बाटली स्वच्छ धुवून घ्या. वास नाहीसा होईल.
लिंबाचा रस
व्हिनेगरप्रमाणेच, लिंबाचा रस देखील एक आम्लयुक्त द्रावण (Kitchen Tips) आहे. जो एक प्रभावी क्लिनर सिद्ध होऊ शकतो.म्हणूनच बाजारातील अनेक डिटर्जंट्स आणि क्लिनिंग सोल्यूशन्समध्ये लिंबाचा घटक म्हणून वापर केला जातो. बाटलीत थोडा लिबचा रस घाला आता त्यात थोडे पाणी घाला. त्यानंतर बाटली शेक करा. त्यानंतर बाटली स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही लिंबाचा तुकडा किंवा संत्र्याची साल देखील वापरू शकता.