Kitchen Tips : चुटकीसरशी चमकेल चहाचं काळाकुट्ट भांडं ; वापरा ह्या सोप्या टिप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : चहा प्रत्येक घरात आवर्जून बनवला जातो. साधारण दिवसातून दोन तीन वेळा चहा बनवला जातो. त्यामुळे कधीकधी चहाचे भांडे हे काळे होते. हे काळवंडलेले भांडे स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. हे करपलेले भांड्याचे डाग जाण्यासाठी महिला चहाचे भांडे रात्रभर पाणी घालून ठेवतात. तरी देखील त्याचा काही उपयोग होत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे चहाचे काळवंडलेले भांडे (Kitchen Tips) चुटकीसरशी साफ होईल. चला तर मग जाणून घेऊया…

मीठ

चहाचं भांड काळे पडले असेल तर मीठ हे ते काळे डाग घालवण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे मीठ आणि साबण एकत्र करायचा आणि मग ते चहाच भांड घासायचं आहे. चहाचा काळवंडलेपणा (Kitchen Tips) दूर होऊन भांडे साफ होईल

बेकिंग सोडा (Kitchen Tips)

बेकिंग सोडा चहाच्या काळ्या भांड्याला साफ (Kitchen Tips) करण्यास तुम्हाला मदत करेल. बेकिंग सोडा थेट स्क्रबर वर घ्या आणि ते भांड धुवा. यामुळे भांड्याचा काळवंडलेपणा निघून जाईल

बेकिंग सोडा आणि मीठ

मीठ आणि बेकिंग सोडा हे दोन्ही पदार्थ क्लीनिंग साठी चांगले उपयोगी ठरतात. चहाच्या भांड्याचे काळे डाग करण्यासाठी सुद्धा हे दोन्ही एजंट महत्त्वाचे आहेत. या दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करून चहाचं भांडं (Kitchen Tips) घासू शकता. त्यामुळे चहाचं भांड चकचकीत होऊन जाईल

लिंबाचा रस (Kitchen Tips)

लिंबाचा रस हा चिकटपणा दूर करतो. त्याचप्रमाणे लिंबाचा रस तुम्हाला चहाचं (Kitchen Tips) काळवंडलेलं भांडं घासण्यासाठी सुद्धा उपयोगी होऊ शकतो यासाठी तुम्हाला ज्या भांड्यात डाग आहेत त्या भांड्यात पाणी आणि लिंबाची एक फोड घाला त्यानंतर हे पाणी उकळून घ्या त्यामुळे हे सगळे डाग नक्कीच जातील