Kitchen Tips: पावसाळ्यात आवर्जून खा रानभाज्या ; चरबी होईल कमी, इतर रोगांवरही गुणकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips: भारतीय आहारपद्धती ही ऋतूनुसार परिपूर्ण आहे. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात आरोग्यासाठी ज्या भाज्या चांगल्या असतात त्या भाज्या त्या – त्या सिझनला मिळत असतात. पावसाळ्यात सुद्धा उत्तम प्रकारच्या काही रानभाज्या येत असतात. विशेष म्हणजे या भाज्या केवळ या पावसाळ्याच्या २-३ महिन्यातच येत असतात. या भाज्या आरोग्यासाठी खूप उत्तम असतात. चला जाणून घेऊया या भाज्या कोणत्या आहेत ? त्यामध्ये कोणती पोषक तत्वे असतात ? या भाज्या खाताना कोणती काळजी घेतली पाहिजे ? चला जाणून घेऊया…

रानभाज्या आरोग्यासाठी उत्तम

रानभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात लोह, ॲण्टीऑक्सिडंट्स, फायबर असतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते रानभाज्या पावसाळ्यात आवर्जून खाल्ल्या पाहिजेत.

रानभाज्या बनवताना काय काळजी घ्यावी ?

  • रानभाज्या जास्त न शिजवता भाज्यांमधील पोषणतत्त्वे टिकून राहतील अशा पद्धतीने करून खाव्यात
  • रानभाज्या बनविताना पुदिना, कैरी, लिंबू टाकून त्यांची पोषणमुल्ये वाढविता येतात.
  • भाज्यांसोबत चपाती ऐवजी भाकरीसोबत खाणे अधिक आरोग्यदायी असते.

रानभाज्या खाण्याचे फायदे

शेवगा – शेवग्याच्या शेंगा आपण नेहमीच वापरतो मात्र भाजी सुद्धा गुणकारी असते. मधुमेह, हृदय, संधीवात, बद्धकोष्ठता असा त्रास कमी करण्यासाठी शेवगा उपयुक्त ठरतो.

अंबाडी – ही भाजी नावाप्रमाणे आंबट असते. भाजीतून व्हिटॅमिन ए, लोह, झिंक, भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे ही भाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच अशक्तपणा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

करटोली – ही भाजी म्हणजे कडू न लागणाऱ्या कारल्याचा दुसरा प्रकार म्हणू शकतो. या भाजीत प्रोटीन्स, लोह, ॲण्टीऑक्सिडंट्स, फायबर मोठ्या प्रमाणावर मिळतात. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे.

अळू – भाजीतून व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम मिळते. ही भाजी हृदयरोगाचा, कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.