Kitchen Tips : प्रेशर कुकरच्या अशा टिप्स ज्या प्रत्येक गृहिणीला माहित असायलाच हव्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : हल्ली कुणाच्या घरात प्रेशर कुकर नाही असे होत नाही. झटपट स्वयंपाक बनवण्यासाठी कुकर खूप कमी येतो. मग इडली असो किंवा झटपट बिर्याणी प्रेशर कुकर शिवाय पर्याय नाही म्हणूनच आम्ही आजच्या लेखात प्रेशर कुकरशी (Kitchen Tips) संबंधित काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

कुकरचा काळेपणा घालावा

अनेकदा कुकर एकसारखा लावल्यामुळे आतून पूर्णपणे काळा होतो. त्याला डाग पडतात. असे डाग आणि काळेपणा घालवण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे ती नक्की वापरून पहा त्यासाठी कुकरच्या (Kitchen Tips) तळाशी खाली लिंबू टाकून कुकरमध्ये पाणी घालून वाफ काढू शकता. सर्वात महत्त्वाचं शिट्टी तुटली नाही ना हे पाहावं त्यामुळे देखील शिट्टी होण्यासाठी अडचणी येतात.

कुकर मधून वाफ जात असल्यास (Kitchen Tips)

कुकरमधून जर वाफ जात असेल तर तुम्ही एक काम करु शकता, हळू कुकर उघडून ती रिंग पुन्हा थंड पाण्यात बुडवून काढा आणि नंतर कुकरला लावा. कुकर लावण्यापूर्वी रिंग काही वेळ थंड पाण्यात ठेवा, त्यानंतर वापरा त्यामुळे वाफ जाणार नाही. हे करुनही जर वाफ जातच असेल तर झाकण व्यवस्थित बसलं नाही किंवा तिरकं लागलं आहे. मग अशावेळी तुम्ही थोडंसं लाटण्याने किंवा लाकडी वस्तूने थोडं त्यावर दाब (Kitchen Tips) देऊ शकता किंवा जास्त जोर न लावता त्यावर थोडं मारुन ते झाकण घट्ट करु शकता. त्यामुळे वाफ जाणार नाही.

कुकर मधील रिंग महत्वाची

कुकरची रिंग ही अतिशय महत्वाचा भाग आहे. कुकरची रिंग नीट नसेल तर कुकर (Kitchen Tips) चालत नाही. ती नीट बसने महत्वाचे आहे. कुकरचा रबर किंवा रिंगमध्ये जर चुकूनही भेग पडली असेल, कुठे कापली गेले असेल किंवा सैल झाली असेल तर ती तातडीने बदलणं आवश्यक आहे. कुकरमधून पाणी बाहेर पडण्याची समस्या असेल तर ती टाळण्यासाठी कुकरमध्ये एक चमचा तूप किंवा कुकिंग ऑइल टाका त्यामुळे कुकरमधून पाणी बाहेर सांडणार नाही.

प्रेशर कुकरचे झाकण चेक करा (Kitchen Tips)

प्रेशर कुकरच्या झाकणावर छेद असतो. यामध्ये काही अडकलं असेल तर शिट्टी होणार नाही. त्यामुळे जेवण शिजणार नाही. यामध्ये काही अडकणार नाही याची काळजी घ्या. कुकरचा (Kitchen Tips) व्हॉल्व देखील महत्वाचा असतो. कुकरचा व्हॉल्व गेला तर कुकर होत नाही.