Kitchen Tips : चहाचे गाळने काळेकुट्ट झाले आहे का ? वापरा सोपी ट्रिक

kitchen tips 12
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : सकाळी लवकर उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लोक दिवसातून अनेक वेळा चहा पितात.चहाचे कण हळूहळू चहाच्या गाळनीत जमा होतात, जे धुऊनही निघत नाहीत. त्यानंतर चहाची गाळणी (KItchen Tips) आणखी काळी व्हायला लागते. मात्र आम्ही आज तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत जेणेकरून तुमचे काळेकुट्ट पडलेले गाळणे नव्यासारखे स्वच्छ निघेल आणि ही ट्रिक आजमावण्यासाठी तुम्हाला जास्त कष्टही घ्यावे लागणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया…

बेकिंग पावडर

बेकिंग पावडरचा वापर स्वच्छता करण्यासाठी देखील केला जातो. याच्या मदतीने तुम्ही अगदी हट्टी डागही काढून टाकू शकता. जर तुम्हाला चहाची गाळणी साफ करण्यासाठी तुम्हाला एका डब्यात(KItchen Tips) गरम पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये ४ चमचे बेकिंग पावडर टाकून गाळणीला ५ मिनिटे यात भिजवावे लागेल. त्यानंतर गाळणी टूथब्रशने स्वच्छ करा. गाळणीची जाळी खूपच घाण असेल तर द्रावणामध्ये तुम्ही थोडा लिंबाचा रस सुद्धा मिसळू शकता. त्यामुळे गाळणी एकदम स्वछ होईल.

आंघोळीचा साबण (KItchen Tips)

तुम्ही आंघोळीच्या साबणाने चहाचे गाळणे देखील स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्हाला हा साबण नीट लावावा लागेल आणि टूथब्रशने घासून स्वच्छ करावा लागेल. तुम्ही तुमच्या गाळणीवर आंघोळीसाठी जो साबण वापरता तो लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी हे गळणे धुतल्यास स्वच्छ होईल.

तुम्ही गॅस चालू करा आणि काळे झालेले घाण झालेले गाळणे थोडा वेळ (KItchen Tips) त्यावर ठेवा. यामुळे त्यात जमा झालेली घाण जळून जाईल आणि नंतर ती काढणे पूर्वीपेक्षा सोपे होईल. तुमची गाळणी पुन्हा नव्यासारखी बनवण्यासाठी हा खूप प्रभावी उपाय आहे.