Kitchen Tips : पुरणयंत्राशिवाय बनवा परफेक्ट पुरण; ट्राय करा ‘ही’ सोपी ट्रिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : भारतीयांचा मोठा सण होळी अगदी चार दिवसांवर येईन ठेपला आहे. होळी रे होळी पुरणाची पोळी! असे आपल्याकडे म्हंटले जाते. बाहेर होळी आणि ताटात पुरणाची पोळी…! ही होळीच्या दिवशी असायलाच पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का पुरणपोळी करणं म्हणजे साधं सुधं काम नाही बर का? प्रत्येकालाच ते जमतं असं (Kitchen Tips) नाही. डाळ किंवा कणिक याचं थोडं जरी प्रमाण चुकलं तर तुमची पुरणपोळी फिस्कटलीच म्हणून समजा. त्यामुळे आजच्या लेखात आम्ही पुरणपोळीचा एक परफेक्ट कॉम्बिनेशन घेऊन आलो आहोत. तुम्ही पुरण हे नेहमी मिक्सर किंवा पुरण यंत्रामध्ये बनवत असाल पण आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके ऑप्शन घेऊन आलो आहोत चला तर मग बघूया पुरणपोळी परफेक्ट कशी बनवायची

पुरणासाठी साहित्य (Kitchen Tips)

पुरण बनवण्यासाठी एक कप चणाडाळ एक कप किसलेला गूळ किंवा साखर एक कप तेल आणि वेलची पूड हे साहित्य आपल्याला लागणार आहे

कृती

पुरूण बनवत असताना सगळ्यात आधी कुकरमध्ये चणाडाळ (Kitchen Tips) घाला. त्यानंतर जितकी चणाडाळ तुम्ही घेतली आहे त्याच्या अडीच पट पाणी घाला आणि पाच ते सात शिट्ट्या काढून घ्या. डाळ चांगली शिजवून घ्या कुकर थंड झाल्यानंतर त्यातील डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्या.

डाळ चांगली शिजल्याची खात्री करून घ्या त्यानंतर पावभाजी स्मॅश करण्याच्या भांड्याने (Kitchen Tips) डाळ स्मॅश करून घ्या. तुमच्याकडे पुरणयंत्र नसेल तर पावभाजीचा जो स्मॅशर आहे हा परफेक्ट काम करेल. डाळ गरम असतानाच ती चांगली बारीक करून घ्या नाहीतर थंड झाल्यावर ती बारीक करणं अवघड होऊन जाते. चना डाळ व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर एका भांड्यात ती काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये किसलेला गूळ किंवा साखर घालून मध्य आचेवर ठेवा. हे मिश्रण तुम्हाला सतत ढवळत राहायचं पुरण शिजत आल्याचे समजताच त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घाला आणि पुन्हा एकदा हे मिश्रण ढवळून घ्या. हे मिश्रण थोडंसं घट्ट झालं की गॅस बंद करून घ्या मिश्रण घट्ट झाले आहे का ? हे ओळखण्यासाठी (Kitchen Tips) मिश्रणात एक चमचा उभा करून ठेवा जर चमचा तसाच उभा राहिला तर समजा तुमचं पूर्ण मस्तपैकी घट्ट झालय.

महत्त्वाची टीप : चण्याची डाळ कुकरमधून काढल्यानंतर जर त्यामध्ये पाणी असेल तर आधी पाणी आटवून घ्या मगच पावभाजी स्मॅशरन डाळ बारीक करून घ्या.