Kitchen Tips : अहाहा sss थंडगार…! उन्हाळ्यासाठी सोप्या पद्धतीने बनवा सोलकढी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : उन्हाळा आला म्हंटलं की घरात वेगवेगळी सरबतं , पेय यांची रेलचेल सुरु असते. त्यातही बच्चे कंपनी घरी असेल तर लिंबू सरबत , कैरीचे पन्हे , विविध फळांचे ज्युसेस अशा गोष्टी आवर्जून बनवल्या जातात. आजच्या लेखात आपण अशाच उन्हाळयात पिण्यासाठी (Kitchen Tips) एकदम परफेक्ट असलेल्या सोलकढीची रेसिपी जाणून घेणारा आहोत.

कोकण आणि सोलकढी हे समीकरण पक्के आहे. मात्र हल्ली राज्यातल्या विविध भागांमध्ये देखील सोलकढी आवर्जून केली जाते. काही हॉटेल्स मध्ये सोलकढी जेवणाच्या ताटाची लज्जत वाढवते. सोलकढी ही पाचक असते. म्हणूनच तीचे सेवन करणे उन्हाळयात योग्य मानले जाते. शिवाय सोलकढीचा रंगच इतका अप्रतिम असतो की कोणीही बघताक्षणी सोलकढीच्या प्रेमात पडेल. अशी ही सोलकढी (solkadhi recipe) बनवायला सुद्धा सोपी आहे. चला जाणून घेऊया सोलकढीची कृती.

सोलकढीची कृती (Kitchen Tips)

ही कृती करण्यासाठी मुठभर आमसूल कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवा दोन-तीन तासांना त्याचा उतरलेला अर्क आमसूल हाताने थोडीशी कालवून घ्या आणि रस काढून गाळून घ्या. जरा तुमच्याकडे कोकम आगळ उपलब्ध असेल तर तुम्ही (Kitchen Tips) आमसुलाऐवजी त्याचा देखील वापर करू शकता.

त्यानंतर दुसरीकडे आपल्याला नारळाचं दूध काढायचं आहे हे नारळाचं दूध काढत असताना त्यामध्ये तुम्हाला जर कढीसाठी तिखटपणा थोडासा हवा असेल तर अर्धी मिरची टाकायला हरकत नाही.

याबरोबरच या वाटणामध्ये थोडंसं लसूण आणि जिरे देखील घालावे. आता या वाटणाचे दूध (Kitchen Tips) काढून घ्यायचे आहे.

नंतर या दुधामध्ये आमसुलाचा जो रस आपण काढलेला आहे तो रस घ्यायचा आहे आणि मिक्स करायचा आहे. ही कृती करत असताना लक्षात घ्या की तुमची कढी हे जास्त आंबट होता कामा नये.

त्यामुळे चव बघत बघत हा रस तुम्ही मिक्स करू शकता. त्यानंतर यामध्ये थोडीशी साखर घाला. आणि चवीनुसार (Kitchen Tips) मीठ तुम्हाला यामध्ये घालायचे आहे. ही तयार झालेली सोलकढी फ्रिजमध्ये ठेऊन थंड झाल्यावर सर्व्ह करा.

अशाप्रकारे झटपट तयार होणारी ही सोलकडीची रेसिपी यंदाच्या उन्हाळ्यामध्ये (Kitchen Tips) आवश्य करून पहा