Kitchen Tips : उन्हाळ्यात फ्रिजमध्ये अशा पद्धतीने ठेवा न्यूज पेपर,पहा कमाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खरंतर उन्हाळा आला म्हंटल की घरात थंड पदार्थांची रेलचेल सुरू होते. अगदी कैरीच्या पन्ह्यापासून आमरस , आईस्क्रीम असेल इतर सगळ्या थंड गोष्टी खाण्यासाठी तुम्ही तयार असता. आणि त्यामुळेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फ्रिज मात्र अशा पदार्थांनी (Kitchen Tips) गच्च भरून जातो.

याशिवाय उन्हाळ्यामध्ये अन्नपदार्थ हे लवकर खराब होऊ नयेत म्हणून ते आपसूकच फ्रीजमध्ये वारंवार ठेवले जातात. आज आम्ही तुम्हाला एक किचनचा असा जुगाड सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या फ्रीजला मात्र त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. हा जुगाड (Kitchen Tips) एका गृहिणी कडून यूट्यूब चैनल वर प्रसारित करण्यात आला आहे.

खरंतर तुम्ही म्हणाल न्यूज पेपर आणि फ्रीज यांचा काय बरं संबंध? सहसा न्युज पेपर रद्दीला दिला जातो किंवा मग तुम्ही इतर काही कारणासाठी त्याचा वापर केला जातो. मात्र आज आम्ही न्युज पेपरचा फ्रीजची संबंधित असलेला एक जुगाड (Kitchen Tips) सांगणार आहोत त्यामुळे उन्हाळ्यात फ्रिजची येणारी समस्या ही नाहीशी होणार आहे.

उन्हाळ्यामध्ये बरेच पदार्थ हे फ्रीजमध्ये ठेवले जातात आणि वारंवार त्याचा वापर होतो. त्यामुळे अनेकदा फ्रिजचा वास येतो. फ्रिज उघडतात पदार्थांचा वास हा असाह्य होतो त्यामुळे अनेकदा कितीही उपाय केले तरी हा वास नाही जात नाही. मात्र आज आम्ही न्यूज पेपर बद्दल एक ट्रिक (Kitchen Tips) सांगणार आहोत त्यामुळे आज फ्रिज मध्ये येणारा हा वास कायमचा निघून जाणार आहे.

काय आहे ट्रिक? (Kitchen Tips)

युट्युब वर दाखवलेल्या हॅक प्रमाणे एक मोठा पेपर चा तुकडा घ्यायचा आहे. या पेपरच्या तुकड्याचा गोळा तयार करायचा आहे. हा गोळा एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये भिजवायचा आहे. हा गोळा भिजवल्यानंतर आता राहिलेले पाणी काढून टाकायचा आहे. आणि हा भिजलेला गोळा बाऊलमध्ये थोडासा पसरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये फ्रीजमध्ये कुबट वास येणार नाही.