Kitchen Tips : चालू गॅसवर टाका तांदूळ ; आरोग्यासंबंधीचा मोठा धोका टळेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : भात म्हणजेच तांदूळ आपल्या आहार शैलीतील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. एवढेच नाही तर लग्नात अक्षता , पूजेसाठी सुद्धा तांदूळ वापरले जातात. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? तांदूळ गॅसवर टाकल्यानंतर काय होते ? कदाचित हा प्रकार तुम्ही आजपर्यंत काही अजमावून पहिला नसेल. चालू गॅसवर तांदूळ टाकल्यानंतर तुमच्या आरोग्य संदर्भातला सगळ्यात मोठा धोका टाळता (Kitchen Tips) येणार आहे. खरंतर हा जुगाड यु ट्यूब वरच्या एका चॅनेल वरून शेअर करण्यात आला आहे. चालू गॅसवर तांदूळ टाकल्याने नक्की काय फायदा होईल ? चला जाणून घेऊया…

नक्की काय करायचे आहे ? (Kitchen Tips)

एका हातात किंवा भांड्यात तांदूळ घ्या. आता गॅस चालू करा आणि चालू गॅसवर काही तांदूळ टाकून पहा ? काय परिणाम दिसतो? तांदूळ गॅसवर टाकल्यानंतर काळे होतील मात्र हे तांदूळ जर ओरिजनल असतील तर त्याची राख होईल. पण हे तांदूळ (Kitchen Tips) भेसळयुक्त असतील तर गॅसवर त्याचा एक चिकट पदार्थ लागलेला दिसेल. हल्ली अन्नपदार्थात भेसळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. तांदळाच्या बाबतीत प्लास्टिक तांदळाची भेसळ होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे चालू गॅसवर तांदूळ टाकून तुमच्या तांदळाची क्वालिटी टेस्ट तुम्ही घरच्या घरी करून घेऊ शकता.

कसा ओळखाल बनावट तांदूळ ? (Kitchen Tips)

  • प्लास्टिक तांदूळ गरम तेलात टाकल्यावर वितळेल.
  • पाण्यात टाकल्यावर तांदूळ तरंगताना दिसेल.
  • प्लॅस्टिकचा तांदूळ उकळताना भांड्याच्या वरचा भाग जाड थरासारखा दिसतो.
  • याशिवाय नेहमीच तांदूळ शिजवल्यानंतर काही वेळाने नासतो. मात्र प्लास्टिकचा तांदूळ नासत नाही.

Priti khandar recipe ☺युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट (Kitchen Tips) करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.