Kitchen Tips : इवल्याशा मुंग्यांचा घरभर उत्पात…! वापरा सोप्या ट्रिक्स मुंग्या होतील सेकंदात गायब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : उन्हाळा सुरु झाला म्हंटल की आपल्या घरामध्ये तुम्हाला मुंग्यांचा वावर जास्त प्रमाणात दिसायला लागेल. मग फरशीवर थोडासा जरी अन्नाचा कण जरी पडला तरी त्याला लगेच मुंग्यांची रांग लागतेच. यात काही मुंग्या ह्या उपद्रवी असतात. त्यांच्या चावण्याने खूप (Kitchen Tips) जळजळ तर होतेच पण फोडही उठतात.

शिवाय अन्न जर किचनमध्ये चुकून जरी उघडे राहीले तर मुंग्या लागल्यामुळे सर्व अन्न पदार्थ खराब होतात. भात, दूध, तलकट पदार्थ अशा पदार्थाना हमखास मुंग्या होतातच त्यामुळेच आजच्या लेखात आपण अशा काही ट्रिक्स पाहणार आहोत ज्यामुळे अवघ्या काही सेकंदात तुम्ही मुंग्यांपासून सुटका करून घेऊ शकता.चला तर मग जाणून घेऊया.

तुम्ही कधी विचार केला आहे का ? उन्हाळ्यात मुंग्या का बरं वारंवार दिसून येतात. तर मंडळी मुंग्या निसर्गचक्राप्रमाणे राहत असतात. पावसाळ्यात अन्न कमी पडू नये म्हणून त्या उन्हाळ्यापासून अन्नाची साठवणूक करीत असतात.

किचन नियमित स्वच्छ ठेवा (Kitchen Tips)

तुम्ही एकी गोष्ट निरीक्षण केले असेल तर किचनमध्ये सर्वाधिक मुंग्या होतात कारण किचनमध्ये अन्नपदार्थ सांडलेले असतात. त्यामुळे रात्री झोपताना आणि जेवण झाल्यानंतर तुमचं किचन हे व्यवस्थित साफ करायला विसरू नका ही स्वच्छता तुम्ही नियमित ठेवा म्हणजे कोणत्याही पदार्थाला मुंग्या लागणार नाहीत.

व्हिनेगर (Kitchen Tips)

व्हिनेगर हे एक प्रकारचे आम्ल आहे. इतर स्वच्छतेच्या हॅक मध्ये व्हिनेगर आवर्जून वापरले जाते. मात्र तुम्ही विनेगर मुंग्यांना पळवून लावण्यासाठी वापरू शकता. जर किचन मध्ये लाल मुंग्या झाल्या असतील तर मुंग्यांना पळवण्यासाठी तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर आणि पाणी यांचे द्रावण तयार करून घ्या त्यानंतर ज्या ठिकाणी मुंग्या झाल्या आहेत त्या ठिकाणी हे मिश्रण स्प्रे करा म्हणजे मुंग्या निघून जातील.

हळद (Kitchen Tips)

खरंतर तुमच्या घरामध्ये आजी किंवा कुणी वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांना जर विचारलं तर हळद हा मुंग्या घालवण्याचा उपाय ते तुम्हाला नक्की सांगतील कारण हळद ही अँटी बॅक्टेरियल आहे. जिथे काळ्या मुंग्या तुम्हाला दिसतील त्यावर फक्त हळद (Kitchen Tips) शिंपडा म्हणजे त्वरित ती जागा सोडून त्या निघून जातात.

बोरेक्स पावडर

धान्य खराब होऊन त्याला किडे लागू नयेत म्हणून बोरेक्स पावडर धान्याला चोळून ठेवली. जाते हीच बोरेक्स पावडर तुम्ही मुंग्या घालवण्यासाठी वापरू शकता. हा उपाय करण्यासाठी एक कप पाण्यामध्ये एक चमचा बोरेक्स पावडर दोन चमचे (Kitchen Tips) साखर घालून व्यवस्थित एकजीव करा. एक कॉटन बॉल पाण्यात घालून ठेवा. त्यानंतर हा कॉटन बॉल का प्लेटमध्ये ठेवा आणि त्याच्या भोवती एक ते दोन चमचे आपण तयार केलेलं बोरेक्स पावडरचे मिश्रण घालून ठेवा. जिथे मुंग्या आहेत तिथेही प्लेट ठेवाल तर मुलगा अजिबात येणार नाहीत.

साबणाचे पाणी (Kitchen Tips)

किचनमध्ये मुंग्यांचा उपद्रव जास्त होतो अशावेळी जेव्हा तुम्ही किचन पुसून घेता तेव्हा साबणाच्या पाण्याने किचन ओटा पुसून घ्या. त्यामुळे मुंग्या येणार नाहीत