Kitchen Tips : गॅस लवकर संपतोय ? बर्नर अस्वच्छ तर नाहीत ना ? 1 सोपी ट्रिक आणि बर्नर होईल चकाचक

kitchen tips burner
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : खरंतर स्वयंपाकघर हे गॅस शेगडी शिवाय आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. सध्या इंधनाच्या वाढलेल्या किंमती पाहता गॅस किती जपून वापरला पाहिजे हे काही वेगेळे सांगायला नको. मात्र वारंवार विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करताना गॅसच्या बर्नरवर हे पदार्थ आपसूकच पडतात,कधीकधी उतू जातात. त्यामुळे बर्नरची छिद्रे मुजली जातात. त्यामुळे गॅस जास्त प्रमाणात वापरला जातो. शिवाय गॅसचे बर्नर काळे होतात पर्यायाने जेवणाची भांडी सुद्धा काळी होतात. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात काही असे फंडे (Kitchen Tips) सांगणार आहोत ज्यामुळे गॅसचे बर्नर स्वच्छ होतील शिवाय गॅसची बचतही होईल चला तर मग जाणून घेऊया…

1) लिक्विड डिश वॉश (Kitchen Tips)

सगळ्यात आधी स्टोव्ह मधून बर्नर काढा त्यानंतर बर्नर वर अडकलेली घाण सुती कापडाने (Kitchen Tips) स्वच्छ पुसून काढा. यानंतर एका वाटीत एक चमचा डिश वॉश लिक्विड घ्या. त्यानंतर त्यामध्ये एक कप कोमट पाणी घाला त्यानंतर त्यात बर्नर ठेवा पाणी थंड झाल्यानंतर बर्नर पाण्यातून काढावा. स्क्रबरने घासून घ्या या ट्रिक मुळे काही मिनिटात बर्नरवर साचलेली घाण आणि काळेपणा निघून जाईल.

2) डिश वॉश आणि लिंबाचा रस (Kitchen Tips)

गॅस स्टोव्हचे बर्नर स्वच्छ करण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा डिश वॉश घेऊन (Kitchen Tips) त्यात एक चमचा लिंबाचा रस घ्या आणि एक चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. आता या मिश्रणामध्ये गॅस बर्नर काही वेळासाठी ठेवा. 20 मिनिटानंतर बर्नर जुन्या टूथब्रशने स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर पाण्याने बर्नर धुऊन घ्या.

3) इनो आणि मीठ (Kitchen Tips)

एका वाटीत कोमट पाणी घ्या त्यामध्ये लिंबाचा रस आणि एक चमचा इनो आणि एक चमचा मीठ तसेच एक चमचा लिक्विड डिश वॉश घालून मिक्स करा. आता या मिश्रणामध्ये बर्नर ठेवून एक दोन मिनिटानंतर स्क्रबरने बर्नर घासा आणि नंतर बर्नरला (Kitchen Tips) धुऊन काढा.