Knee Arthroscopy : गुडघेदुखीने हैराण? आर्थ्रोस्कोपी केल्यास मिळेल आराम; जाणून घ्या फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Knee Arthroscopy) आजकालची जीवनशैली पाहता प्रत्येकाच्या आरोग्याबाबत काही ना काही तक्रारी या असतातच. केवळ वृद्धांमध्ये नव्हे तर तरुण मंडळींमध्ये देखील आरोग्यविषयक अनके समस्या दिसून येत आहेत. खास करून गुडघे दुखी सारख्या समस्येने तरुणांची पिढी चांगलीच काबीज केली आहे. कमी वयातच लोकांना गुडघ्यात वेदना होणे, सांध्यांचे नुकसान, फ्रॅक्चर, अस्थिबंधां फाटणे अशा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत.

या समस्यांवर मोठमोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्याऐवजी एक उत्तम उपाय म्हणून ‘आर्थ्रोस्कोपी’कडे (Knee Arthroscopy) पाहिले जाते. याचा वापर गुडघ्याच्या दुखापतींचे निदान आणि उपचार यासाठी केला जातो. गुडघ्याची आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय आणि त्याचे फायदे कोणते आहेत? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

गुडघ्याची ‘आर्थ्रोस्कोपी’ करणे म्हणजे काय? (Knee Arthroscopy)

गुढघ्याची आर्थ्रोस्कोपी ही सांध्यांवर केली जाणारी छोटी शस्त्रक्रिया आहे. यात त्वचेवर लहान चीरा देऊन आर्थ्रोस्कोप घालून सांध्यांची तपासणी केली जाते. गुडघ्याच्या समस्यांचे निदान करण्यासाठी आर्थ्रोस्कोपीत लहान उपकरणे वापरली जातात. ज्यामध्ये व्हिडीओ कॅमेरा, लाइट सोर्स आणि रिन्सिंग/सक्शन डिव्हाईसचा वापर केला जातो. (Knee Arthroscopy) या उपकरणांच्या साहाय्याने आर्थ्रोस्कोप सर्जनला स्क्रीनवर समस्येचे निरीक्षण करुन योग्य तपासणी करता येते. मेनिस्कस टिअर, अस्थिबंधनांसंबंधी दुखापत, फ्रॅक्चर आणि सांधे निखळणे या समस्यांसाठी गुडघ्याची आर्थ्रोस्कोपी केली जाते.

‘आर्थ्रोस्कोपी’ करण्याचे फायदे काय?

1. त्वरित निदान, त्वरित उपचार

गुडघ्याच्या आर्थ्रोस्कोपीमुळे दुखापत, अंतर्गत जखम व वेदनांचे त्वरित निदान करता येते. यामुळे सर्जनला त्वरित कोणते उपचार देणे गरजेचे आहे हे समजते. (Knee Arthroscopy) आर्थ्रोस्कोपीमूळे समस्येचे निदान लवकर होते आणि यामुळे लवकर उपचार करता येतात. या दरम्यान दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत नाही आणि समस्येपासून लवकर आराम मिळतो.

2. कमी जोखीम

कोणत्याही शास्त्रक्रियेआधी रुग्णाला पुढे काय होणार? याची भीती सतावू लागते. अशावेळी रुग्णांसाठी सकारात्मक दृष्टीकोन गरजेचं असतो. आर्थ्रोस्कोपीमध्ये बहुतेकदा अत्यंत कमी जोखीम असल्याचे दिसून येते. (Knee Arthroscopy) मात्र पुनर्प्राप्तीस लागणारा वेळ आणि रोग निदान हे गुडघ्याची समस्या काय आहे आणि त्याची तीव्रता काय आहे? यावर अवलंबून असते. या प्रक्रियेनुसार काही बदल होऊ शकतात.

3. अचूक निदान

गुडघ्याच्या आर्थ्रोस्कोपीत गुडघ्याच्या विविध स्थितींचे अचूक निदान करणे सोपे असते. या शस्त्रक्रियेत ऊतींच्या कार्यात कमीतकमी व्यत्यय आणून उपचार करण्याची क्षमता असते. यात वापरले जाणारे लहान कॅमेरे गुडघ्याच्या सांध्याआतील भागाचे निरीक्षण करणे आणि आतील भागांची अस्थिबंधनाच्या दुखापतींसारखी समस्या हाताळण्यास उपयुक्त ठरते.

4. लहान चीरा

गुडघ्याच्या आर्थ्रोस्कोपी (Knee Arthroscopy) शस्त्रक्रियेचा मुख्य फायदा म्हणजे सर्जरीदरम्यान त्वचेवर लहान चीरा केल्या जातात. यांमुळे ऊतींचे नुकसान कमी होते. शिवाय या प्रक्रियेमूळे रुग्णांना लवकर बरे होता येते.

5. सांध्यांच्या संरचनेत व्यत्यय येत नाही

गुढघ्यांची आर्थ्रोस्कोपी करतेवेळी त्वचेवर लहान चीरा केल्या जातात. या चिरांच्या माध्यमातून सांध्यामध्ये आर्थ्रोस्कोपीसाठी वापरली जाणारी लहान साधने टाकली जातात आणि समस्येचे निदान केले जाते. (Knee Arthroscopy) आर्थ्रोस्कोपी ही एक कमीतकमी हल्ल्याची प्रक्रिया असल्याने याला कीहोल शस्त्रक्रिया म्हणतात. या प्रक्रियेमुळे सांधे संरचनेत व्यत्यय न आणता अगदी यशस्वीरीत्या ही शस्त्रक्रिया केली जाते.

6. स्नायूंवर कमी ताण येतो

आर्थ्रोस्कोपी दरम्यान स्नायूंवर कमी ताण येतो. यामुळे गुडघ्याचे सांधे निरोगी होतात आणि शरीराचा ताणदेखील कमी होतो. तसेच या शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनादेखील कमी होतात.

7. कमी कालावधीत मिळतो आराम

गुढघ्याची आर्थ्रोस्कोपी ही शस्त्रक्रिया बऱ्यापैकी कमी आक्रमक आहे. त्यामुळे बहुतेक रुग्णांवर ही प्रक्रिया तासाभरात पूर्ण होते. ही शस्त्रक्रिया साधारण एक दिवसाची असते. ज्यामुळे दीर्घकाळ रुग्णालयात पडून रहावे लागत नाही. (Knee Arthroscopy) तसेच कमी कालावधीत लवकर आराम मिळतो.