Stomach Cancer : पोटाचा कॅन्सर झालाय हे कसे ओळखाल? जाणून घ्या मुख्य लक्षणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stomach Cancer) आजकालची बिघडलेली जीवनशैली मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करते आहे. कोरोनानंतर जनमानसात आरोग्याबाबत मोठी काळजी निर्माण झाली आहे. साधा खोकला आला तरी लोक घाबरू लागली आहेत. हवा, पाणी आणि अन्न यातून गंभीर विषाणूंचा फैलाव झाल्यामुळे जगभरात कोरोनासारखी महामारी पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक लोकांना आपण गंभीर आजाराशी सामना करत आहोत, याची कल्पना नसते. त्यामुळे एखादा आजार शेवटच्या स्टेजवर गेल्यानंतर समजते. अशा परिस्थितीत माणसाला जीव गमवावा लागतो. अशाच एका लगेच समजुन न येणाऱ्या आजाराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

कॅन्सर हा महाभयंकर रोग आहे. (Stomach Cancer) त्यामुळे या आजाराचं नुसतं नाव जरी काढलं तरी घबराट निर्माण होते. आज आपण कॅन्सरच्या प्रकारांपैकी एक पोटाच्या कॅन्सरविषयी माहिती घेणार आहोत. तो कसा होतो? त्याची लक्षणे काय? आणि पोटाचा कॅन्सर झाल्यास काय उपचार करावे लागतात? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

पोटाचा कॅन्सर कसा होतो? (Stomach Cancer)

पोटाचा कॅन्सर होण्यामागे हेलिकोबॅक्टर पायलोरी संक्रमण असू शकते. यासाठी एक जिवाणू जबाबदार असतो. जो पोटात गेल्याने आतड्यांना सूज गेस्ट्राइटिस सारखी समस्या निर्माण होते. शिवाय पेप्टिक अल्सर दिसून येतो. अशी समस्या आढळून आल्यास पोटाचा कॅन्सर झाला असे म्हटले जाते.

पोटाच्या कॅन्सरची लक्षणे

  • अपचन किंवा छातीत जळजळ
  • पोटदुखी किंवा अस्वस्थता
  • मळमळ आणि उलटी
  • अतिसार किंवा बद्धकोष्ठता
  • जेवणानंतर पोटफुगी
  • भूक न लागणे
  • जेवताना घशात अन्न अडकणे
  • आतड्यांवर सूज येणे

पोटाचा कॅन्सर कसा ओळखाल?

पोटाचा कॅन्सर झालेल्या व्यक्तीला सुरुवातीच्या टप्प्यात विशिष्ट लक्षणे दिसून येत नाही. ज्यामुळे आपण अशा एखाद्या गंभीर आजाराशी सामना करतोय याची रुग्णाला कल्पनाच नसते. (Stomach Cancer) त्यामुळे तब्येतीत होणारे असाधारण बदल आपल्याला एखाद्या आजाराचे संकेत देत आहेत हे समजून घ्या. तब्येतीचे गांभीर्य ओळखून वेळीच तपासणी करा. असे केल्यास पोटाच्या कॅन्सर विषयी माहिती मिळू शकते.

पोटाच्या कॅन्सरवर काय उपाय करावे?

पोटाचा कॅन्सर झाल्यास व्यक्ती दीर्घायुष्य जगू शकते की नाही? याबाबत एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर मुळात पोटाचा कॅन्सर झाल्यास सर्वात आधी सुरुवातीच्या टप्प्यात तो समजायला हवा. असे झाल्यास वेळीच उपचार करणे शक्य होते. शस्त्रक्रियेद्वारे ट्यूमरला शरीरापासून वेगळे करता येते. यानंतर पथ्ये आणि काळजी घेऊन तो रुग दीर्घायुष्य जगू शकतो. (Stomach Cancer)