Kojagiri Purnima 2024: यंदाच्या वर्षीची कोजागिरी पौर्णिमा उद्या दिनांक 16 ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हमखास मसाला दूध बनवून पिण्याची परंपरा आहे. मात्र बऱ्याच गृहिणी मसाला दूध बनवण्यासाठी बाहेरून मसाला विकत आणतात पण तसे करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घराच्या घरी दुधाचा मसाला बनवू शकता. दीर्घकाळ टिकणारा दूध मसाला कसा बनवायचा ? (Kojagiri Purnima 2024) चला जाणून घेऊया…
मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Kojagiri Pornima 2024)
बदाम – 1/2 कप
काजू – 1/2 कप
पिस्ता – 1/4 कप
हिरवी वेलची – 25
काळी मिरी पावडर – 1/2
टीस्पून सुंठ पावडर – 1 टीस्पून
जायफळ – 1/4 (किसलेले)
केशर – 1/2 ग्राम (किंवा आवडीनुसार)
हळद पावडर – 1 टीस्पून
कृती (Kojagiri Pornima 2024)
- दूध मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम काजू, पिस्ता आणि बदाम मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. त्यानंतर ते पुर्णपणे थंड होऊ द्या.
- केशर 10 सेकंद भाजून घ्या आणि बाजूला ठेवा, त्याच पॅनमध्ये मिरपूडदेखील 1 ते 2 मिनिटे भाजून घ्या. सुंठ देखील असेच भाजून घ्यायचे आहे. सर्व सामान पूर्णपणे थंड होऊ द्या.
- त्यानंतर जायफळ आणि वेलची मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पूड पावडर करून घ्या. आता भाजलेला सुकामेवा गार झाला असल्यास तो मिक्सरमध्ये घालून त्याचीही जाड पावडर करून घ्या.
- सुकामेव्याची पावडर आणि आधी तयार केलेली पावडर एका भांड्यात एकत्र करा. त्याता केशर, घालून हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करा म्हणजे दूध मसाला तयार होईल.
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा (Kojagiri Pornima 2024)
- ड्रायफ्रुट्स आणि मसाले बारीक करताना ते गरम नसावेत.
- ड्रायफ्रुट्स मसाला वाटताना पल्स मोशनमध्ये मिक्सर चालवा. म्हणजे दुधात वरून ड्रायफ्रूट घालण्याची गरज नाही.
- तयार मसाला हवाबंद डब्यात ठेवा.
- पावडर रेफ्रिजरेटरमध्ये बराच काळ ठेवता येते.