Kokan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर ! गणेशोत्सवासाठी पाच महिने आधी करता येणार बुकिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kokan Railway: गणेशोत्सव आणि होळी हे कोकणवासीयांचे दोन महत्त्वाचे सण आहेत. या दोन्ही सणासाठी कोकणवासी कुठेही बाहेर गेला असेल तर तो आपल्या गावी या दिवसांमध्ये येत असतो. त्यामुळे यावेळी ट्रेन बस गाड्यांना मोठी गर्दी असते. विशेषतः ट्रेन ने प्रवास करणारे प्रवासी अधिक असतात. हीच बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने गणेशोत्सवा करिता पाच महिने आधी आरक्षण करण्याची सोय केली आहे. त्यामुळे कोकणवासी (Kokan Railway) आपल्या गावी सहजतेने जाऊ शकणार आहेत.

10 मे पासून खुलं होणार आरक्षण

यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. कोकणामध्ये तिथून पुढे दहा ते पंधरा दिवस हा उत्सव दिमाखात चालतो. यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे कडून खास (Kokan Railway) सोय करण्यात आली असून आता प्रवाशांना 10 मे पासून तिकीट बुक करता येणार आहे.कोकण मार्गावर सोडण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्यांचा आरक्षण 120 दिवस आधी म्हणजेच दहा मे पासून खुलं होणार आहे त्यामुळे भाविकांना पाच महिने आधीपासूनच ट्रेनचे तिकीट आरक्षित करता येणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोकणामध्ये लाखो लोक जात असतात. या दिवसात गाड्यांचे बुकिंग फुल्ल असते त्यामुळे काहींना ट्रॅव्हल्स चे अतिरिक्त पैसे देऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे रेल्वेचे तिकीट मिळण्यासाठी चाकरमानी पहाटेपासून तिकीट खिडक्यांवर रांग लावून उभे असतात. तरीही तिकीट (Kokan Railway) मिळत नाही अशी परिस्थिती असते. यंदा मात्र प्रत्यक्ष तिकीट खिडक्यांबरोबर ऑनलाईन तिकीट सुद्धा आरक्षित करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोणत्या मार्गावरून रेल्वे धावतील कोणत्या स्पेशल ट्रेन (Kokan Railway) चालवल्या जातील याची माहिती मात्र कोकण रेल्वेने अद्याप जाहीर केलेली नाहीये मात्र येत्या दहा मे पासून गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण खुलं होणार आहे.