Kolhapur : पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग औद्योगिक क्षेत्रात होणार नव्या बोगद्यांची निर्मिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kolhapur : राज्यामध्ये विविध रस्ते प्रकल्प हाती घेतले जात आहेत. काही महामार्गांचा विस्तार केला जात आहे तर काही महामार्ग नव्याने बनवले जात आहेत. समृद्धी महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल असे मोठे रस्ते प्रोजेक्ट सध्या बनवण्याचे काम राज्यामध्ये सुरू आहे. दरम्यान कागल सातारा या रस्त्यावर देखील सहा पदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हे सहा पदरीकरण केले (Kolhapur)जात असताना या ठिकाणी अनेक मोठे बोगदे तयार करण्यात येणार आहेत.

कागल ते सातारा या दरम्यान 133 किलोमीटर अंतरावर सहा पदरीकरण करण्यात येणार आहे. तर वारणा नदी ते कागल या 29 किलोमीटर अंतरावर अनेक ठिकाणी बोगदे तयार केले जाणार आहेत. याचे कारण असे आहे म्हणजे या मार्गावर अनेक अशी ठिकाणे (Kolhapur) आहेत जिथे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे अपघात रोखण्यासाठी मदत होणार आहे.

या ठिकाणी होणार बोगदे

मंगरायाची वाडी, मेनन पिस्टन, नागाव फाटा, सांगली फाटा, या ठिकाणी 25 मीटरचे तर उचगाव, उजळाईवाडी, कनेरी वाडी या ठिकाणी वीस मीटरचे बोगदे तयार होणार आहेत.

मंगरायाची वाडी (Kolhapur)

मंगरायाची वाडी हा भाग पाहिला तर येथे नवीन लहान औद्योगिक वसाहत (Kolhapur) विस्तारित होत आहे. तसंच येथे दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची शेती आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे बोगद्याची मागणी केली होती. तसंच शिरोली एमआयडीसीमध्ये मोठे मालवाहतूक गाड्या येण्यासाठी आणि जाण्यासाठी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि उद्योजकांची मागणी होती की या ठिकाणी बोगदा तयार करण्यात यावा. त्यानुसार या ठिकाणी बोगदा तयार करण्यात येत आहे.

नागाव फाटा

मागच्या अनेक दिवसांपासून नागाव फाटा हा अपघाताचा स्पॉट ठरत असल्यामुळे तसेच दोन्ही बाजूला ट्रान्सपोर्ट व्यवसाय असल्याने मोठ्या व्यवहारीक गाड्यांची वाहतूक येथे असते. नागाव आणि शिरोली गावातील स्थानिक लोकांसाठी बोगद्याचे (Kolhapur) काम सुरू आहे. याबरोबरच शिरोली सांगली फाटा इथे सांगलीला जाण्यासाठी जुना एक मार्गी मोठा बोगदा होता. आता दोन्ही बाजूला या ठिकाणी बोगदा होणार आहे.

उचगाव फाटा

उचगाव ते हुपरी या ठिकाणी जाण्यासाठी मार्गावर सध्या लहान बोगदा आहे. मात्र या ठिकाणी (Kolhapur) सतत वाहतूक कोंडी होत असते. या ठिकाणी सध्याचा बोगदा पाडून नवीन वीस मीटरचा बोगदा तयार केला जाणार असून उजळवाडी, के आय टी, गोकुळ शिरगाव, कनेरी वाडी या ठिकाणी वीस मीटरचा बोगदा तयार केला जाणार आहे.