कोल्हापुरात काँग्रेसला खिंडार ! अमल महाडिकांनी विजय खेचून आणला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर जिल्ह्याचा एकूण राजकीय इतिहास पाहता कोल्हापुरात हात म्हणजेच काँग्रेसचाच विजय होताना दिसत आला आहे. कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या या बालेकिल्लाला मोठा खिंडार पडताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाल्याचे दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १० पैकी ९ जागांवर महाविकास आघाडीला झटका बसला असून सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मधील ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक या दोघांच्या मधली लढाई ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. कारण सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे मागील काळामध्ये आमदार होते आणि यंदाच्या वेळी कोल्हापूरची जनता कुणाला साथ देते हे पाहणं महत्वाचं मानलं जात होतं.

मात्र इथे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव झाला असून भाजपचे अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला निकाल कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये लागला आहे. या निकालामुळे सतेज पाटील यांना झटका लागला आहे . तर अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा विजय खेचून आणला आहे.

कोल्हापूर दक्षिणची लढाई ही अत्यंत प्रतिष्ठित मानली जात होती. धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यपातळीवरती गेली होती त्यामुळे कोल्हापूर दक्षिणच्या हाय व्होल्टेज लढाईमध्ये कोण बाजी मारणार याकडे केवळ जिल्ह्याचे नव्हे तर अख्या राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं. त्यामुळे सतेज पाटील यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली होती मात्र कोल्हापूरच्या जनतेने एकूणच महायुतीला कौल दिला असून कोल्हापुरात झालेली सीएम योगींची सभा, लाडकी बहिणी योजना ही या विजयामध्ये महत्त्वाचे फॅक्टर दिसत आहेत.