Kolkata Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेप ; कोर्टात नक्की काय घडले ?

Kolkata Rape-Murder Case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kolkata Rape-Murder Case : आरजी कर रुग्णालयाच्या ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात कोलकात्याच्या सियालदा कोर्टाने दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सीबीआयने कोर्टासमोर युक्तिवाद केला की, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, कारण हा दुर्लभ प्रकारचा (रेअर ऑफ द रेयरेस्ट) प्रकरण आहे. परंतु न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटले की, हे प्रकरण दुर्मिळतम प्रकारात मोडत नाही. त्यामुळे आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची ( Kolkata Rape-Murder Case ) शिक्षा दिली जाते.

जन्मठेप म्हणजे 14 वर्ष नव्हे, संपूर्ण आयुष्य कारागृहात

कोर्टाने स्पष्ट केले की संजयची जन्मठेप 14 वर्षांत संपणार नाही. त्याला उर्वरित आयुष्य जेलच्या ताटाखाली घालवावे लागेल. तसेच, आरोपीवर 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आता संजय रॉयला संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागणार आहे.

पीडित कुटुंबाची नाराजी ( Kolkata Rape-Murder Case )

पीडितेच्या कुटुंबीयांनी कोर्टाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी न्यायाधीशांकडून दिल्या गेलेल्या 50 हजार रुपयांच्या भरपाईचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. त्यांचा दावा आहे की डॉक्टर मुलीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती.

कोर्टात काय घडले?

कोर्टामध्ये आरोपी संजय रॉय पुन्हा एकदा निर्दोष असल्याचे म्हणत जजसाहेबांकडे गयावया करत होता. त्याच्या आईनेही न्यायाधीशांकडे दयेची याचना केली. यावेळी न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून, निकाल दुपारी 2:45 वाजेपर्यंत राखून ठेवला होता.

संजय रॉयचे कोर्टात वक्तव्य ( Kolkata Rape-Murder Case )

संजय रॉयने कोर्टात गयावया करत म्हटले की, त्याला फसवले जात आहे. त्याने असेही सांगितले की, “जर मी दोषी असतो, तर माझ्या गळ्यातील रुद्राक्ष माळ तुटली असती.”

रुग्नालय परिसरात हत्या

ऑगस्ट 2024 मध्ये कोलकात्यातील रुग्णालयाच्या आवारात ट्रेनी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बाण दास यांनी 18 जानेवारीला संजय रॉयला दोषी ठरवले होते.