RG Kar Rape case : महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि खून प्रकरणात संजय रॉय दोषी ; 20 जानेवारीला सुनावली जाणार शिक्षा

0
2
RG Kar Rape case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

RG Kar Rape case : अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात प्रशिक्षित महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आता महत्वाची अपडेट हाती आली आहे. या प्रकरणी आरोपी संजय रॉयला दोषी (RG Kar Rape case) ठरवण्यात आले आहे. सियालदह न्यायालयाच्या विशेष कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

20 जानेवारीला शिक्षा जाहीर होणार

सियालदह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांच्या कोर्टाने सिव्हिक व्हॉलंटियर असलेल्या आरोपीला दोषी ठरवले. 20 जानेवारी रोजी न्यायालय त्याला शिक्षा सुनावणार आहे. या खटल्याची सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी सुरू झाली होती आणि 59 दिवसांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता, ज्यांनी याआधीच आरोपपत्र दाखल केले आहे.

पीडितेचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये सापडला

गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी आरजी कर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये पीडितेचा मृतदेह सापडला होता. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुख्य आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याला सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना दिसले होते. घटनास्थळावर त्याचा हेडफोन देखील सापडला. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, संजय रॉयच मुख्य आरोपी (RG Kar Rape case) आहे.

इतर आरोपींची तपासणीची मागणी

पीडितेच्या पालकांनी न्यायालयात सांगितले की या प्रकरणात एकाहून अधिक व्यक्ती सामील असण्याची शक्यता आहे. त्यांनी तपास अपूर्ण असल्याचा आरोप केला आहे. कारण या गुन्ह्यात सामील इतर लोक अजूनही मुक्तपणे फिरत आहेत. केंद्रीय तपास संस्थेने संजय रॉयसाठी फाशीची शिक्षा मागितली आहे.

देशभरात संतापाचा उद्रेक (RG Kar Rape case)

या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. शेकडो लोकांनी निषेध नोंदवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले होते, ज्यामध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आता 20 जानेवारीला होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.