Kokan Expressway : मुंबई ते गोवा सुसाsssट ! कोकणात जाण्यासाठी आणखी एक महामार्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kokan Expressway : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई ते गोवा हे अंतर कमी करण्यासाठी कोकण एक्सप्रेस हा प्रकल्प हाती घेतला आहे. सध्याचा विचार करता मुंबई ते गोवा या प्रवासासाठी 12 तास लागतात. मात्र कोकण एक्सप्रेसवे मूळ प्रवाशांना हा प्रवास जलद करता येणार असून हे अंतर केवळ सहा तासांमध्ये पार करता येणार आहे. चला जाणून घेऊया या नव्या कोकण एक्सप्रेसवे (Kokan Expressway) बाबत…

कोकण एक्सप्रेसवे चा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसी यांच्याकडून हाती घेण्यात आला आहे. या मार्गाची एकूण लांबी ही 363 किलोमीटर इतकी असणार आहे. तर यामध्ये सहा मार्गिकांचा समावेश असणार आहे. तर या मार्गाची रुंदी 100 मीटर प्रस्थापित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 68 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर अलिबागच्या शहाबाद इथून हा मार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधापर्यंत हा मार्ग जाणार आहे. या महामार्गाची वेगमर्यादा ही 100 ते 200 पर्यंत असेल. महत्वाची गोष्ट म्हणजे कोकणातील 22 गावांमधून तर 17 तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथून इंटरचेंज दिला (Kokan Expressway) आहे तिथूनच पाहण्यांना बाहेर पडता येणार आहे आणि महामार्गावर प्रवेशही मिळणार आहे.

या कोकण एक्सप्रेस वे साठी 5792 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. तर 146 हेक्टर बनजमीन या महामार्गात बाधित होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया सुरू केली आहे. महत्त्वाची गोष्ट (Kokan Expressway) म्हणजे या महामार्गामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. महामार्ग पश्चिम घाटातील इकॉलॉजिकल सेंसिटिव्ह होऊन असलेल्या 22 गावातून जाणार आहे.

कोणत्या गावांचा समावेश (Kokan Expressway)

तालुके : अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यांचाही समावेश आहे.

अलिबाग – शहाबाज
माणगाव – मढेगाव
मंडणगड -केळवट
दापोली -वाकवली
गुहागर- गुहागर
रत्नागिरी – गणपतीपुळे, रत्नागिरी
राजापूर – भालवली, देवगड मालवण
कुडाळ – चिपी विमानतळ
सावंतवाडी – वेंगुर्ला आणि बांदा या ठिकाणांजवळ इंटरचेंज प्रस्तावित करण्यात आले आहेत.