Konkan Railway : आता गणेशोत्सवाचीही चिंता मिटली ; रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Konkan Railway : कोकणी माणसांसाठी होळी आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण खूप महत्वाचे असतात. नोकरी धंद्यानिमित्त गावापासून इतर ठिकाणी स्थायिक झालेला कोकणी माणूस हमखास या दोन्ही सणाला गावी जातो. यावेळी रेल्वेला मोठी गर्दी देखील पाहायला मिळते. म्हणूनच रेल्वे विभागाकडून यावर्षी होळीसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यापैकी एक गाडी सप्टेंबर पर्यंत चालू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय (Konkan Railway) घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार होळीनिमित्त सुरु करण्यात आलेल्या नागपूर- मडगांव जंक्शन नागपूर या आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची सेवा थेट सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे.खरेतर होळीसाठी सुरु करण्यात आलेल्या (Konkan Railway) या विशेष गाड्या केवळ ३१ मार्च पर्यंत धावणार होत्या. मात्र आता या गाडयांना ९ जून पर्यन्त चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय या गाड्यांची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवली जाणार असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र अधिकृत याची घोषणा अद्याप झाली नाही.

या स्थानकांवर थांबा (Konkan Railway)

नागपूर-मडगाव-जंक्शन ही रेल्वेगाडी वर्धा जंक्शन, पुलगाव, शेगाव, मलकापूर, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, करमाळीसह इतर (Konkan Railway) स्थानकांवर थांबेल,

कोकण रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकानुसार नागपूर-मडगाव-जंक्शन ही गाडी 3 एप्रिल ते 8 जून दरम्यान प्रत्येक आठवड्यातून बुधवार आणि शनिवार अशा दोन दिवशी धावणार आहे. मडगाव जंक्शन- नागपूर ही विशेष गाडी 4 एप्रिल ते 9 जून दरम्यान पावसाळी (Konkan Railway) दिवस वगळता आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.