हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kuldhara Village) संपूर्ण जगभरात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे रहस्य आजही दडलेली आहेत. ज्यांच्याविषयी संशोधन करूनही संशोधकांना ठोस असे कोणतेच पुरावे मिळालेली नाहीत किंवा विज्ञान या रहस्यांचा उलगडा करू शकलेले नाही. आपल्या भारतात अशा अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत ज्यांच्या विषयी फार कमी लोकांना ठाऊक आहे. यात काही ठिकाण, वस्तू आणि अगदी वास्तूंचादेखील समावेश आहे. यांपैकी एका गूढ रहस्यमयी गावाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
हे रहस्य आहे ५ हजार गायब झालेल्या लोकांचं. आपल्या भारतात एक असं रहस्यमय गाव आहे ज्या गावातून रातोरात एक दोन नव्हे तर तब्बल ५ हजार माणसं गायब झाली होती. त्यानंतर हे गाव गेल्या २०० वर्षांपासून ओसाड पडले आहे. चला तर जाणून घेऊया या गावातील रहस्य नेमकं काय आहे आणि हे गाव कुठे आहे?
कुठे आहे हे रहस्यमयी गाव?
भारतात राजस्थानमधील जैसलमेरपासून १४ किलोमीटर अंतरावर वसलेलं ‘कुलधारा’ हे एक रहस्यमय गाव असल्याचे म्हटले जाते. १२९१ च्या आसपास पालीवाल ब्राह्मण समाजाने सरस्वती नदीच्या काठावर हे गाव वसवले होते. त्यावेळी या गावात मोठी वस्ती होती आणि रेलचेलदेखील असायची. (Kuldhara Village) मात्र आज हेच गाव अक्षरशः ओसाड पडले आहे. कधीकाळी अत्यंत समृद्ध आणि संपन्न असलेल्या या गावात आज कोणीच फिरकत नाही. लोक या गावी जायला घाबरतात. त्यामुळे या गावी जाण्यासाठी दळणवळणाची साधने देखील आता फार कमी उरली आहेत. गेल्या २०० वर्षांपासून या गावात लोकवस्ती नाही. येथील वास्तू देखील आता भयाण आणि भग्न अवस्थेत ओसाड पडल्या आहेत.
कुलधारा गावाचा इतिहास काय सांगतो? (Kuldhara Village)
राजस्थानमधील कुलधारा हे गाव ब्राह्मणांनी बसवले होते. हे ब्राह्मण पाली या भागातून जैसलमेर येथे स्थलांतरित होऊन आले होते. त्यामुळे या ब्राह्मणांना पालीवाल म्हणून ओळखले जायचे. पाली येथील काधान या ब्राह्मणाने कुलधारा गावात आपले पहिले घर बांधले. इतकेच नव्हे तर या ब्राह्मणाने या ठिकाणी एक मोठा तलाव देखील खोदला होता. या तलावाला उउधंसर असे नाव देण्यात आले होते. हळू हळू आसपास आणखी ८४ गावं वसली. सगळं काही सुखी आणि समृद्ध होत. पण ग्राममंत्र्यांच्या काळ्या नजरेने या गावाला शापित बनवलं.
गावकऱ्यांवर आलं होत संकट
१८०० च्या दशकात ग्राममंत्री सलीम सिंग याने ग्रामस्थांकडून जादा कर गोळा करून त्यांचा विश्वासघात केला होता. त्याची घाणेरडी नजर ग्रामस्थांच्या कमाईवर होतीच. शिवाय येथील एका पुजाऱ्याच्या मुलीवर देखील पडली. त्याच्या हवस आणि सत्तेच्या ताकदीपुढे कुणाचा निभाव लागणार नाही हे सगळ्यांना माहित होत. अशात त्याने गावकऱ्यांना आदेश दिला की, पुढच्या पोर्णिमेआत या मुलीला माझ्यासमोर हजर करा. (Kuldhara Village) कुलधराबरोबर आजूबाजूला असेलेली ८४ गावं विभागलेली होती मात्र अडीअडचणीत ही सगळी एक असायची. ग्राममंत्र्याच्या आदेशावर चर्चा करण्यासाठी या गावांनी पंचायत बसवली. आता निर्णय घ्यायचा होता. हे धर्म संकट टाळायचं कसं?
.. अन रातोरात गायब झाली 5000 लोक
या समस्येवर आता एकच पर्याय होता. गाव सोडणे. त्यामुळे गावकऱ्यांनी मिळून एका रात्रीत निर्णय घेतला. जिथं आपल्या मुली सुरक्षित नाहीत त्या भागाचा त्याग करायचा. लेकीबाळींच्या अब्रूसाठी शेतकऱ्याने शेतजमीन सोडली, व्यापाऱ्याने व्यापार सोडला, गुराख्याने शक्य होती तेव्हढी गुरं सोबत आणि शक्य नव्हती त्यांचा त्याग केला. (Kuldhara Village) शक्य होत्या त्या वस्तू घेतल्या, सोबत जी वृद्ध मंडळी येऊ शकत होती त्यांना सोबत घेतले आणि बाकीच्यांचा निरोप घेऊन गावातील लोक रातोरात निघून गेले. कुलधरासह आसपासच्या ८४ गावातल्या गावकऱ्यांनी एका रात्रीत गाव रिकामं केलं आणि जाता जाता मागे ठेवला तो श्राप.
शापित कुलधारा
कुलधारा गावासोबत आजुबाजूच्या ८४ गावांतील लोकांनी आपला संसार, संपत्ती सगळं काही सोडलं. पण जाताना या तळमळलेल्या जीवांनी दिलेला श्राप फळला. (Kuldhara Village) असं म्हणतात की यातलं ओसाड पडलेलं कुलधारा गाव हे एक शापित गाव आहे. या गावातील ब्राम्हणांनी गावातून पाय बाहेर टाकताना वेशीवर श्राप दिला होता की, इथली उभी घरं- दारं, उद्योग- धंदे, जमिनी आम्ही वसवलं. पण आता पुन्हा या भागात कुणीही वसू शकणार नाही. यानंतर कुलधारा मध्ये ज्यांनी वसण्याचा प्रयत्न केला त्यातील कुणीच शिल्लक उरलं नाही.
कुलधारा गावाला ऐतिहासिक स्थळाचा दर्जा
राजस्थान मधील कुलधारा गावात गेल्या 200 वर्षांपासून मानवी वस्ती नाही. त्यामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित पद्धतीने या संपूर्ण गावात संशोधन केले गेले. यात 85 छोट्या वसाहती दिसून आल्या. लहान-मोठी घर उध्वस्त झालेली आढळून आली. यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने कुलधारा गावाला ऐतिहासिक स्थळाचा दर्जा दिला आणि आज हे गाव पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. अनेक पर्यटक हे गाव पाहण्यासाठी येत असतात. (Kuldhara Village)
रात्री 6 नंतर कुणी फिरकत नाही
या गावातील भयाण शांतता रात्री मात्र आवाज करते, असे काही लोक सांगतात. आसपासचे गावकरी, पर्यटक या ठिकाणी बोलण्याचा आवाज, चालण्याचा आवाज, किंकाळ्या, अचानक जवळून कुणीतरी गेल्याचा भास, घुंगरुंचा आवाज, भांड्याचा आवाज ऐकल्याचे सांगतात. त्यामुळे आज जगभरातले लोक हे गाव पाहायला तर येतात. (Kuldhara Village) पण संध्याकाळी ६ वाजायच्या आधीच इथून निघून जातात. संध्याकाळी ६ नंतर सूर्य मावळला की इथे पुन्हा कुणीही येण्याची हिंमत करत नाही.