Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर!! अदिती तटकरेंची मोठी घोषणा

0
3
Ladki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – महायुती सरकारने महिलांसाठी सुरु केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करत आहे . या योजनेअंतर्गत, अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती आणि त्यानंतर राज्यातील सुमारे 21 ते 65 वयाच्या 2 कोटी महिलांना लाभ मिळाला आहे. अनेक महिलांमध्ये जानेवारीचा हप्ता (ladki Bahin Yojana) कधी मिळणार याबाबत प्रश्न होते . पण उद्या म्हणजेच 26 जानेवारीला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे . तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

26 जानेवारी 2025 पर्यंत हप्ता जमा (Ladki Bahin Yojana)

आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत 9 हजार रुपये प्रत्येक पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात (Ladki Bahin Yojana)जमा झाले होते. आता, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जानेवारी 2025 चा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 24 जानेवारी 2025 रोजी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. त्यांच्या ट्विटनुसार, 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाले असून, 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हा निधीचा हप्ता जमा होईल.

एकूण 10,500 रुपये मिळतील –

जानेवारीच्या हप्त्यानंतर, (Ladki Bahin Yojana) महिलांना एकूण 10,500 रुपये मिळतील, कारण जुलै ते डिसेंबर दरम्यान 9,000 रुपये आधीच जमा झाले होते. या योजनेचा फायदाही राज्यभरातील सुमारे अडीच कोटी महिलांना झाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठा आधार मिळाला आहे.

हे पण वाचा : डिसेंबरमध्ये तब्बल 45 लाख SIP खाती बंद; गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज