हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार , याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना आता आनंदाची बातमी भेटणार आहे. नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात या हप्त्याबद्ल सांगण्यात आले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांचा पुढील हप्ता कधी भेटणार आहे , हे आज आपण पाहणार आहोत . तर चला जाणून घेऊयात या बदल अधिक माहिती.
डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार –
सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे ऑक्टोबर महिन्यातच जमा केले होते. आता पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशनानंतर लवकरच वितरित केला जाईल, असे आश्वासन दिले आहे . म्हणजेच 21 डिसेंबर 2024 रोजी अधिवेशन संपल्यानंतर, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्याही क्षणी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सर्व महिलांनी वेळोवेळी त्यांची बँक खाती तपासणे गरजेचे आहे.
बँक खाते आधार कार्डशी लिंक –
निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही अर्जांची छाननी प्रक्रिया थांबली होती. आता ती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत, पण अजून लाभ मिळाला नाही, त्यांनी खात्री करावी की त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का . बँक खाते आधारशी लिंक असल्यासच या योजनेचे पैसे मिळू शकतात. बँक खात्याशी आधार लिंक करण्यासाठी, https://uidai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आधार लिंकिंग स्टेटस तपासावे. त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस वर क्लिक करून, आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा. ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन केल्यानंतर, तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही, याची माहिती मिळेल. जर बँक खाते लिंक नसेल, तर संबंधित बँकेत जाऊन ते आधारशी लिंक करावे.
अत्यंत लोकप्रिय योजना –
हि योजना राज्यातील महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली असून, या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 जमा केले जातात. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण 7500 रुपये जमा करण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाल्यास महिलांच्या रक्कमेत वाढ होणार आहे.