हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – महाराष्ट्र राज्य सरकारने सुरु केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेमधून राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. पण सध्या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे, ज्यामुळे या महिन्याचा हप्ता मिळण्यास उशीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर चला हा हप्ता कधी भेटणार याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
फेब्रुवारी महिन्याचे लाभ देण्याची प्रक्रिया (Ladki Bahin Yojana)-
पडताळणीच्या पहिल्या टप्प्यात महिलांच्या नावावर चारचाकी वाहन असल्याची माहिती मिळालेल्या लाभार्थ्यांची तपासणी केली जात आहे. या तपासणीसाठी अंगणवाडी सेविकांना संबंधित महिलांच्या नावे दिली गेली आहेत, आणि त्यांचा अहवाल शासनाला आठ दिवसांत सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर, फेब्रुवारी महिन्याचे लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होईल, आणि मार्चमध्ये ती पूर्ण होणार असल्याचे सांगितले आहे.
सर्व प्रक्रिया आठवड्यात पूर्ण होणार ?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) ज्या महिलांना लाभ मिळत होता त्यातील अनेक महिलांना मिळणार लाभ थांबवण्यात आला आहे. त्याचसोबत नवीन नियमानुसार महिलांनी दिलेल्या सर्व कागदपत्रांची फेर तपासणी करण्यात येत आहे. तसेच हि सर्व प्रक्रिया आठवड्यात पूर्ण होईल आणि त्यानंतरच या हप्त्याचे वितरण केले जाईल.
इतर योजनांवर ताण –
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये (Ladki Bahin Yojana)होणाऱ्या खर्चामुळे शासनाच्या इतर योजनांवर ताण पडताना दिसत आहे. त्यामुळे काही योजनांचा लाभ देखील थांबवण्यात आला आहे. योजनेसंदर्भात सरकारने केलेल्या तपासणीमुळे काही महिलांना लाभ मिळण्यात अडचणी येत असल्या तरी, योजनेची सत्यता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी हे उपाय आवश्यक ठरले आहेत.