Ladki Bahin Yojana: खुशखबर !! लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळणार

0
4
Ladki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षांपर्यंतच्या गरजू महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आतापर्यंत या योजनेतून महिलांना सात हप्ते देण्यात आले आहेत. आता फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार (Ladki Bahin Yojana) –

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 3500 कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, हप्त्यासाठी काही दिवसांचा उशीर झाल्याचे बालविकास विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. अर्जाची पडताळणी आणि अपात्र महिलांना वगळण्याच्या प्रक्रियेमुळे हा उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बालविकास विभागाचे स्पष्टीकरण अन कारणे –

बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या योजनेत (Ladki Bahin Yojana) अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमुळे हप्त्यासाठी काही दिवसांचा उशीर झाला आहे. मात्र, आता सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

विरोधकांकडून टीका –

विरोधकांकडून या योजनेवर टीका होत आहे. त्यांचा असा आरोप आहे की या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, सरकारच्या प्रतिनिधींनी असे स्पष्ट केले आहे की योजना थांबवण्याचा कोणताही हेतू नाही. अपात्र महिलांना वगळण्याचा निर्णय आर्थिक भार कमी करण्यासाठी घेतला आहे.

आठवा हप्ता आजपासून मिळणार –

आतापर्यंत या योजनेतून महिलांना (Ladki Bahin Yojana) सात हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे.