हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – राज्यातील महिलांसाठी महत्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या 30 एप्रिल रोजी, अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर वितरित केला जाणार आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, या योजनेत ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच लाभ दिला जात आहे आणि कोणताही बदल योजनेच्या अंमलबजावणीत करण्यात आलेला नाही.
आदिती तटकरे काय म्हणाल्या (Ladki Bahin Yojana) –
अलीकडेच सरकारने अर्जांची पडताळणी सुरू केली असून त्यामुळे काही महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे मार्च महिन्यात लाभ मिळालेल्या सर्व महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार का, याकडे अनेक महिलांचे लक्ष लागले आहे. मंत्री तटकरे यांनी सांगितले की, योजनेच्या सुरुवातीपासून पात्र महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. “ऑक्टोबर 2024 मध्ये जेव्हा लाभ दिला गेला, त्यावेळी 2 कोटी 33 लाख महिला लाभार्थी होत्या. आता ही संख्या 2 कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
योजनांमधून 1500 रुपयांचा थेट लाभ –
योजनेच्या (Ladki Bahin Yojana) निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांनाच हा लाभ दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सरकारचा उद्देश म्हणजे महिलांना सरकारी योजनांमधून किमान 1500 रुपयांचा थेट लाभ मिळावा. नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये अशा पद्धतीने हा लाभ पोहचवण्यात येतो, असंही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलं.
या तारखेला मिळणार हप्ता –
आता 30 एप्रिल रोजी मिळणाऱ्या हप्त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा सण राज्यातील लाखो महिलांसाठी (Ladki Bahin Yojana) गोड ठरणार आहे. मात्र, योजनेतील लाभार्थ्यांची संख्यात्मक स्थिती एप्रिलमध्ये काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.